Marriage Esakal
पुणे

पुण्यात वधूचा सिनेस्टाइल प्रवास, बोनेटवर बसून जात असलेला VIDEO VIRAL

जनार्दन दांडगे.

आपलं लग्न जरा हटके व्हावं, असं प्रत्येक नवं विवाहित जोडप्यांला वाटतं. ते आयुष्यभर लोकांच्या आठवणीत राहावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात.

लोणी काळभोर (पुणे)- कोरोना काळात बऱ्याच जोडप्यांनी हटके पद्धतीने लग्न केलं. कुणी हवेत म्हणजेच विमानात तर, कोणी समुद्राच्या पाण्यात.. असं असलं तरी आपलं लग्न जरा हटके व्हावं, असं प्रत्येक नवं विवाहित जोडप्यांला वाटतं. ते आयुष्यभर लोकांच्या आठवणीत राहावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात.

मात्र, हे प्रयत्न करत असताना काही अतिउत्साही जोडप्यांना कायद्याच्या धाकाचाही विसर पडल्याचं पाहण्यात येत आहे. पुण्यातील दिवे घाटात देखील अशीच एक कायद्याची पायमल्ली करणारी घटना उघडकीस आली आहे. दिवे घाटातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये पुण्यातील भोसरी परिसरात राहणारी एका नवरी मुली चक्क चारचाकी वाहनांच्या बोनेटवर बसून लग्नाचा प्रवास करत असताना दिसत आहे. नवरीने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीच्या बोनेटवर बसून मिरवत थेट दिवे घाटात मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला आहे.

सासवड जवळील सिध्देश्वर मंगल कार्यालयात आज या नवरी मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र, या उत्साही नवरी आणि तिच्या कुटुंबियांना चक्क कायद्याचा धाकाचा विसर पडला आहे. धोकादायक रीतीने प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आता पुणे पोलिस या नवरी मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई करतात का याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: भारतीय खेळाडूच्या आजीला आलेला हार्टअॅटॅक, पण वर्ल्ड कपसाठी कुटुंबाने घेतलेला मोठा निर्णय

Mumbai News: मुंबई सेंट्रल एसटी स्थानक राज्यात अव्वल; स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमात मानाचा तुरा

Shah Rukh Khan vs Salman Khan: शाहरुख की सलमान कोण आहे संपत्तीत वरचढ, एकाकडे मन्नत, दुसऱ्याकडे माउंटन व्ह्यू! पैशाचा बादशाह कोण?

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Agriculture News : वाटाणा-शेवगा २०० रुपये किलो! अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामान्य ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT