Brijbhushan Singh on Raj Thackeray 
पुणे

Brijbhushan Singh : पुण्यात येऊन बृजभूषण सिंह यांचे राज ठाकरेंवर वक्तव्य! म्हणाले, "कधीकाळी महाराष्ट्रात..."

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह हे पुण्यात आले आहेत. पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते उपस्थित राहणार आहेत. खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले आहेत. (Brijbhushan Singh on Raj Thackeray)

महाराष्ट्रात आले तर राज ठाकरे यांना भेटणार का?, असा प्रश्न बृजभूषण सिंह यांना विचारण्यात आला. यावर बृजभूषण सिंह म्हणाले राज ठाकरे मंचावर आले तर आम्ही त्यांना नक्की भेटणार. त्यांच्याशी काही वयैक्तिक वैर नाही. ते आले तर त्यांची चांगली भेट घेऊ. 

बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत यायला विरोध केला होता. मात्र राज ठाकरेंनी त्यांना महाराष्ट्रात येण्यावर विरोध केला नाही. यावर देखील बृजभूषण यांनी भूमिका स्पष्ट केली.

बृजभूषण सिंह म्हणाले, "कधीकाळी महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील नागरिकांना त्रास झाला होता. यावर राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. मी म्हणालो होतो राज ठाकरे यांना देखील माहित नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या नागरिकांना त्रास झाला असेल. पण आता ती गोष्ट संपली, दिवसे गेले."

महाराष्ट्र नेहमी कुस्तीचे राज्य

महाराष्ट्र नेहमी कुस्तीचे राज्य राहीले आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी जगाच कुस्तीचे सर्वात पहिले मैदान महाराष्ट्रात बनवले. तेव्हापासून आजपर्यंत कुस्तीचे मोठे नाव आहे. महाराष्ट्रात लाखो प्रेक्षक येतात. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर संपूर्ण देशाते लक्ष लागले आहे, असे बृजभूषण सिंह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News: देशी गायींच्या संवर्धनासाठी शासनाची 'लाडकी गाय योजना'; महिन्याला १,५०० रुपये, संकरित गायींना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

Beed News: एकाच झाडाला १८ वेगवेगळ्या जातीचे आंबे; नारळापेक्षा मोठा आंबा; पाण्याचं दुर्भिक्ष्य तरी १६ एकरात फुलवली बाग

Vidarbha News: विदर्भात उष्णतेची भीषण लाट; अमरावतीत पारा ४६.८ अंशांवर; अंगाची लाहीलाही

Latest Marathi News Live Update : डिझेल मिळेना, शेती संकटात; जालन्यात पेट्रोल पंपांवर गर्दी

Farmer Success Story: बांधावर लावलेल्या मलबेरीने बदलले नशीब; एक रुपयाही खर्च नाही, उत्पन्न मात्र लाखमोलाचे, मधुकर गावडे सहा वर्षांपासून घेतात उत्पन्न..

SCROLL FOR NEXT