Bullock Cart Competition Sakal
पुणे

सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर राजुरी, उंचखडक गावात प्रथमच बैलगाडा शर्यतींचा रंगणार थरार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास आठ ते नऊ वर्षांनी प्रथमत:च बैलगाड्याच्या शर्यतीचे आयोजन होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास आठ ते नऊ वर्षांनी प्रथमत:च बैलगाड्याच्या शर्यतीचे आयोजन होत आहे.

- राजेश कणसे

आळेफाटा - राजुरी, (Rajuri) उंचखडक (Uanchkhadak) (ता. जुन्नर) येथील श्री भैरवनाथ देवस्थान उंचखडक, राजुरी हे राजुरी व पंचक्रोशीतील भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान आहे. श्री भैरवनाथ हे जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडीच्या शर्यती (Bullockcart Competition) यात्रोत्सवाच्या वेळी आयोजित केल्या जातात. यात्रेचे हे ७८ वे वर्ष असून उत्तर पुणे जिल्ह्यातील बैलगाडा स्पर्धा असलेली सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी भरते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास आठ ते नऊ वर्षांनी प्रथमत:च बैलगाड्याच्या शर्यतीचे आयोजन होत आहे. घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना नियम व अटींचे पालन करून या वर्षी दि.१७ व १८ मार्च रोजी यात्रोत्सवाचे व बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी प्रथम क्रमांकाच्या गाड्यास १,००,००० रु., द्वितीय क्रमांकाच्या बैलगाड्यास ७५,०००, तृतीय क्रमांकाच्या बैलगाड्यास ५०,०००, चतुर्थ क्रमांकाच्या बैलगाड्यास २५,००० बक्षीस ठेवण्यात आले आहे.

तसेच प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या फळी फोड गाड्यास प्रत्येक दिवशी अनुक्रमे ११,१११, ७,०००, ५,०००, ३,००० अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. त्यांनतर प्रत्येक दिवसाच्या फायनलसाठी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या गाड्यांसाठी १५,१५०, ७,५०० व ५,५०० अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. दोन्ही दिवसांसाठी घाटाचा राजा साठी ११,१११ रुपयांची पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोठ्या उत्साहात आणि दिमाखात राजुरी आणि उंचखडक ग्रामस्थ उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा यात्रोत्सव संपन्न करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील हा बैलगाडा शर्यतींचा सर्वात मोठी यात्रा असून या ठिकाणी अहमदनगर, नाशिक, ठाणे या ठिकाणाहून अनेक बैलगाडा या ठिकाणी येत असतात. या बैलगाडा शर्यतीचे टोकन रविवार दि. १३ मार्च रोजी सकाळी ठीक १० वाजता भैरवनाथ सभागृह उंचखडक, ता. जुन्नर, जि. पुणे येथे रु ३०० फी घेऊन दिले जाणार आहे. अशी माहिती भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय हाडवळे व सचिव सयाजी हाडवळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT