Crime
Crime 
पुणे

पुणे : बांधकाम व्यावसायिक खून प्रकरणी पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्या खून प्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी चौघांना अटक केली. बावधन येथील दहा एकर जागेच्या वादातून कानाबार यांचा सोमवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

या प्रकरणी राहुल आनंदा कांबळे, रूपेश आनंदा कांबळे, गणेश ज्ञानेश्वर कुऱ्हे (रा. बावधन), हसमुख जसवंतभाई पटेल (रा. बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी (ता.७) दिली. सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, नामदेव चव्हाण यावेळी उपस्थित होते. कानाबार यांच्या मोटारचालकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. कानाबार यांचा आरोपी कांबळे, कुऱ्हे यांच्याबरोबर जमिनीचा वाद होता. त्याच वादातून कांबळे, कुऱ्हे यांनी पटेल याला हाताशी धरून त्यांचा खून केला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष जमदाडे, अमोल काळे, संतोष पागार, कैलास डुकरे, किरण तळेकर, कुसाळकर यांनी ही कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पटेल याने झाडल्या गोळ्या :
जमिनीच्या वादावर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर कानाबार यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावरच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, कानाबार यांच्यावर गोळ्या झाडणारा हल्लेखोर हसमुख पटेल असल्याचे निष्पन्न झाले, असे गुप्ता यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT