Businessman Avinash Bhosele arrested Businessman Avinash Bhosele arrested
पुणे

राजकीय नेत्यांशी संबंध असणारे अविनाश भोसले कोण आहेत? वाचा...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : येस बँक डीएचएफएल प्रकरणात सीबीआयने अविनास भोसले (Avinash Bhosele) यांना अटक केली आहे. अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील काही आघाडीच्या राजकारण्यांच्या जवळचे आहेत, असे बोलले जात आहे. भोसले यांचे राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबीयांसोबत जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. भोसल हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री विश्वजीत कदम (Viswajit Kadam) यांचे सासरे आहे.

पुण्यातील बाणेर येथील प्रासादतुल्य निवासस्थान आणि शहरातील इतर मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयच्या या छापेमारीमुळे राजकीय आणि बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अविनाश भोसले यांची सीबीआयकडून सध्या कसून चौकशी केली जात आहे. माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजीत कदम (Viswajit Kadam) हे उद्योजक अविनाश भोसले यांचे जावई आहेत.

भोसले (Avinash Bhosele) हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख आहे. ते पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक (Businessman) म्हणून ओळखले जातात. त्यांचे महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबध आहेत. येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली. अलीकडेच रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अविनाश भोसले यांचे नाव समोर आले होते.

काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास

अविनाश भोसले (Avinash Bhosele) यांच्या घरावर एप्रिल महिन्यात सीबीआयने छापे घातले होते. मागील वर्षी सीबीआयने त्यांची तब्बल ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त केली होती. मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास सुरू आहे. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिण्याच सीबीआयने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT