MEMS control room
MEMS control room ani
पुणे

108 रूटवरील 'कॉल' वाढले; MEMS च्या यंत्रणेवरही वाढतोय ताण

शरयू काकडे

पुणे : सध्या कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्ण आढळल्यानंतर सर्वांत आधी १०८ क्रमांक डायल करतो आणि रुग्णवाहिका बोलावतो. सदैव सेवेस तत्पर असलेल्या महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या यंत्रणेवरही कोरोना काळात ताण वाढत आहे. तरीही सातत्याने रुग्णांच्या मदतीला धावून येणारी रुग्णवाहिणी जीवनदायिनी ठरत आहे.

''सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहून नागरिकांमध्ये (पॅनिक) घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या या MEMSच्या कॉल सेंटरमध्ये कोरोना काळात येणाऱ्या कॉलची संख्या वाढली आहे. सध्या कोरोना आणि आत्पाकालीन वैद्यकीय सेवेसाठी रोज १०००० पेक्षा जास्त कॉल्स येत असून त्यामध्ये पूर्वीपेक्षा साधारण २००० कॉल्स रोजचे वाढले आहे'', अशी माहिती महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या कॉल सेंटरच्या कंट्रोल रुमचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. ज्ञानेश्वर शेळेके यांनी 'सकाळ'ला दिली.

महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) ७ वर्षांपुर्वी सुरु झाली. १०८ या टोल फ्री क्रमांकावरुन महाराष्टाच्या विविध भागात वैद्यकीय आत्पाकालीन सेवा पुरविण्यात येत आहे. कोणत्याही आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर पहिल्या १0 ते १५ मिनिटांत (Golden Over) मध्ये वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा दिली जाते. यासाठी १0८ हा क्रमांक नवजीवन देणार ठरतो. गेल्या काही वर्षात १०८ क्रमांकाचा वापर वाढला आहे. दरम्यान, सध्या कोरोना काळात हा वापर तुलनेने जास्त वाढल्याचे समजते.

"ऐरवी रोज साधारण ८००० ते ९००० पर्यंत कॉल्स १०८ क्रमांकावर येत होते. कोरोना काळात त्यामध्ये २००० ने वाढ झाली. सध्या रोज १०००० पेक्षा जास्त कॉल्स येत आहे. पुर्वी राज्यातील साधारण ३५०० ते ४००० रोज रुग्णांना सेवा दिली जात होती. कोरोनाकाळात जवळपास ४५००-५००० रुग्णांना सेवा दिली जात आहे. त्यापैकी ६० टक्केपेक्षा जास्त रुग्ण कोरोना संबधित असतात. त्यातही पुणे, नाशिक, नागपूर आणि अकोला या शहरातील सर्वाधिक रुग्ण असतात.'' अशी माहिती शेळके यांनी यावेळी दिली.

''कोरोनाकाळात नातेवाईक रुग्णांच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या घरात जाऊन हॉस्पिटलमध्ये पोहचविण्याचे काम येथील MEMS चे डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचारी करतात. कित्येकदा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे कामही तेच करतात. चौकटीच्या बाहेर जाऊन रुग्णांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. सध्या MEMSमध्येसाधारण ५५०० पेक्षा जास्त प्रॉफेशनल्स काम करतात. त्यापैकी १० टक्के कर्मचाऱ्यांना कोरोना झालाच होता. 'स्टाफ हेल्पलाईन' मार्फत या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व मदत केली जाते.'' असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आत्पालकालीन वैद्यकीय सेवा कशी काम करते?

१०८ क्रमांकावर कॉल आल्यानंतर साधारण ३ मिनिटांचा वेळ असतो. त्यामध्ये पेशंट नाव नंबर आणि पत्ता घेतला जातो. जवळच्या अॅम्ब्युलन्ससोबत तो कॉल जोडून दिला जातो. प्रत्येकवेळी अॅब्युलन्स व्यवस्थित सॅनिटाईज केली जाते.

अॅम्ब्युलन्स सेवा मिळालेले एकूण रुग्ण ५८,८९, ८०३

(आकडेवारी १२ एप्रिल २०२१ पर्यंत)

एकूण अॅम्ब्युलन्स ९३७

सर्वसाधारण ७०४

अत्याधुनिक - २३३

कोविड रुग्णांसाठी उपलब्ध अॅम्बुलन्स -५३५

अॅम्ब्युलन्स सेवा मिळालेले एकूण रुग्ण -५०२५७२

( संशयित/ बाधित)

दररोज साधारण किती कॉल येतात?

सध्या(कोरोना काळात) १०००० पेक्षा जास्त

पुर्वी कोरोना काळाच्या पुर्वी ८०००-९०००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT