bill pay.jpg 
पुणे

वीजदरवाढ रद्द करण्यासाठी सोशल मिडीयावर 'हे' अनोखे अभियान

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोकायत संघटनेतर्फे "वीज दरवाढ रद्द करा' या मागणीसाठी सोशल मीडियावर अभियान करण्यात आले. अभियानामध्ये लोकांनी हातामध्ये "वीज दरवाढ रद्द करा', "शंभर युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करा' अशा मागण्यांचे पोस्टर पकडून स्वत:चे फोटो काढले व ते सोशल मीडियावर टाकले. अशा प्रकारे या अभियानास मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिला. कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्याला आता शंभर दिवसांहून अधिक दिवस लोटले आहेत. या काळात सर्व बंद असल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात रोजगार गेले आहेत. त्यातही ज्यांचे रोजगार आहेत, त्यांचे पगार कमी झाले आहेत.

नवीन रोजगारही लोकांना मिळत नाहीत. या कारणामुळे लोकांना कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे अवघड झाले आहे. दुसऱ्या बाजूला या संपूर्ण काळात स्वस्त व काही प्रमाणात दिलेले मोफत धान्य वगळता केंद्र वा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत जनतेला झालेली नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तथाकथित वीस लाख कोटी पॅकेजमधून गरिबांना काहीही मिळालेलं नाही.


सामान्य लोकांच्या या वाईट परिस्थितीतही एप्रिल पासून नवीन वीजदर लागू केले गेले. नवीन वीजदर लागू झाल्याने जनतेवर वीजबिलाचा भार वाढला आहे. स्थिर आकार, वहन आकार, वीज आकार या तिन्ही मध्ये दरवाढ केली आहे. त्यामुळे पहिल्या 100 युनिटपर्यंत वापर असलेल्यांच्या दरात 16 टक्के झाली आहे. तर 100 युनिट्‌सच्या वर वापर असलेल्यांच्या दरात 13 टक्के आहे. यामुळे लोकांची वीजबिल प्रचंड वाढलेली आहेत, त्यामुळे याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi cabinet: राज्यसभा तिकिटांनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा बदल? चार मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांची चर्चा... कुणाला संधी?

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली, लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू

अधिकाराचा गैरवापर करत कैद्याची सुटका, बदल्यात पत्नीशी संबंध ठेवले; उपमहानिरीक्षकाला अटक; पोलीस दलात खळबळ

Marathi News Live Updates: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्लाय९१ची सेवा सुरू

SCROLL FOR NEXT