Darvatkar Aaji Sakal media
पुणे

पुण्यातील दारवटकर आजींना कॅनडाहून मदतीचा हात

'सकाळ' वर्तमानपत्रातील बातमी वाचून समाजातील दानशूर लोकांनी पाठबळ देण्याचे ठरवले. अनेक सामाजिक संस्था आणि दानशूर लोकांनी दारवटकर आजींची भेट घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

महेश जगताप

'सकाळ' वर्तमानपत्रातील बातमी वाचून समाजातील अनेक दानशूर लोकांनी आजींना पाठबळ देण्याचे ठरवले. अनेक सामाजिक संस्था आणि दानशूर लोकांनी दारवटकर आजींची भेट घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्वारगेट : आठ दिवसांपूर्वी सकाळच्या (Sakal Media) ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि वर्तमानपत्रात दोन मुले गेली तरी आजींची आपल्या नातवंडांच्या शिक्षणासाठी असलेली जिद्द आणि कष्टाच्या जीवावर पुन्हा उभा राहण्याचा दुर्दम्य आशावाद या आशयाची बातमी (News) प्रसिद्ध करण्यात आली होती. याला प्रतिसाद देताना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरची बातमी वाचून कॅनडा (Canada) येथे स्थाईक असलेले आणि मूळचे पुण्यामधील सहकारनगरचे शशिकांत हांडे यांनी या आजींच्या नातवांच्या शिक्षणासाठी पाठबळ देण्याचे ठरवले आणि थेट शांताबाई दारवटकर आजींच्या बँक अकाउंटमध्ये दहा हजार रुपये जमा केले. (Canada resident person extended a helping hand to Darwatkar Aaji who lived in Pune)

दारवटकर आजींची दोन तरणीताठ पोर मरण पावली. एकला जाऊन दहा वर्षे लोटली, तर एक गेल्या सहा महिन्यात गेला. त्यामुळे सगळी नातवंडांची जबाबदारी पडली आहे, पण या जबाबदारीच मला ओझं नाही. कारण आजपर्यंत कष्टातूनच मी उभारली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी नातवंडांना चांगलं शिक्षण देणार आहे. लोकांची मदत किती दिवस टिकणार त्यामुळे मलाच हातपाय हलवावे लागणार. पुन्हा मी कष्टाच्या जीवावर उभी राहणार आहे, असा आशावाद दारवटकर आजींनी व्यक्त केला होता. या आशावादाला 'सकाळ' वर्तमानपत्रातील बातमी वाचून समाजातील अनेक दानशूर लोकांनी आजींना पाठबळ देण्याचे ठरवले. अनेक सामाजिक संस्था आणि दानशूर लोकांनी दारवटकर आजींची भेट घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आजींना आपल्या नातवांच्या शिक्षणासाठी दिलासा मिळाला आहे. काही परोपकारी लोकांमुळे हा समाज चालतो, अशी भावना 'सकाळ'शी बोलताना दारवटकर आजींनी व्यक्त केली.

ही बातमी माझ्या वाचनात आली आणि मला राहवलं नाही. एखाद्या माणसावर किती संकट येतात, पण आजींनी नातवंडांसाठी पुन्हा कष्ट करायची जिद्द धरली आहे म्हटल्यावर आपलाही वाटा यात असलाच पाहिजे, असा विचार करून मी मदत करण्याचे ठरवले. तसं पाहिलं तर ही मदत नाहीच, मी पुण्याचा नागरिक असल्याने हे माझे कर्तव्य समजतो.

- शशिकांत हांडे, कॅनडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT