SPPU 
पुणे

पुणे विद्यापीठातील विशेष प्राध्यापकांची नियुक्ती रद्द करा; कुलगुरूंकडे मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्याच पुन्हा विशेष प्राध्यापक म्हणून  नियुक्त्या केल्या जात आहेत. या नियुक्त्या  करताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांचे पालन होत नाही. शिवाय लाखो रुपये पगारावर खर्च होत असल्याने विद्यापीठ फंडाला गळती लागली आहे. त्यामुळे बेकायदेशीर नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे. पुणे विद्यापीठाकडे असणाऱ्या सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. गेल्या ४ वर्षात या ठेवी सव्वा तीनशे कोटीपर्यंत खाली आल्या आहेत. राज्य शासनाने भरती थांबविल्याने विद्यापीठातील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे फंडातील रक्कम वापरून प्राध्यापक भरती केली जाते. दरवर्षी ६० कोटी रुपये विद्यापीठ फंडातून नियुक्त केलेल्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत आहेत. त्यामुळे विद्यापीठ फंडातून केली जाणारा मोठा खर्च थांबविणे गरजेचे आहे, अशी मागणी विद्यापीठ अधिसभा सदस्य शशिकांत तिकोटे संतोष ढोरे आणि दादाभाऊ सिनलकर, अभिषेक बोके यांनी केली आहे.

विद्यापीठातील पदे भरायची असतील तर ती जाहिरात प्रसिद्ध करून, सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी करावी. यामध्ये तरुणांना संधी दिली तर त्यांचे भले होईल. गेल्या काही वर्षात विद्यापीठ फंडातून नियुक्त केलेल्या विशेष प्राध्यापकांच्या व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात.तसेच यातून होणारी विद्यापीठातची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणीमागणी सदस्यांनी केली आहे. 


"विद्यापीठात सध्या ३२ विशेष प्राध्यापक आहेत, त्यातील १२ जणांना १ लाख, तर इतरांना ५० हजारापेक्षा जास्त पगार आहे. हे प्राध्यापक नियुक्त करताना यूजीसीच्या नियमांचे पालन होत नाही. जाहिरात देऊन प्राध्यापक भरती केल्यास तरुणांना संधी मिळेल. सेवानिवृत्त प्राध्यापकांना पुन्हा नियुक्त करून लाखो रुपये पगार देणे योग्य नाही."
-शशिकांत तिकोटे, सदस्य, अधिसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miss Universe 2026: भारताची १९ वर्षीय सौंदर्यवती यंदा 'मिस युनिव्हर्स'च्या मुकुटावर नाव कोरणार? जाणून घ्या काजियाचा प्रवास

तीन महिन्यांत चांदी तब्बल १ लाखांनी स्वस्त! आता भाव आणखी कोसळणार की उसळी घेणार?

IND W vs SA W: दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध मायदेशात होणाऱ्या ODI, T20I अन् Test सामन्यांसाठी संघ जाहीर; लॉरा वूल्फार्ट कर्णधार

जळगावच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा संशय! मृतदेहाजवळ नारळ, लिंबू, अंडी अन् दारूची बाटली, घटना CCTV त कैद

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २१ नोव्हेंबर २०२६ ते २७ नोव्हेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT