Cancer Patient Sakal
पुणे

कॅन्सरच्या रुग्णांना शहरी गरीब योजनेचा आधार

वर्षभरात गरीब योजनेतून १०८० जणांना मिळाली केमोथेरपीसाठी मदत

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना कॅन्सरसारख्या (Cancer Patient) दुर्धर रोगावर उपचार परवडत नाहीत. मात्र, पुणे महापालिकेची (Pune Corporation) शहरी गरीब योजनेने गरीब रूग्णांना मोठा आधार दिला आहे. गेल्या नऊ महिन्यात या योजनेतून १ हजार ८० रूग्णांना किमोथेरपीचे बील महापालिकेने दिले आहे. (Cancer Patient Gareeb Scheme)

शहरातील गरीब रूग्णांना खाजगी रूग्णालयातही इतरांप्रमाणे वैद्यकीय उपचार मिळावेत या उद्देशाने पुणे महापालिकेने २०११ पासून शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू केली. पहिल्या वर्षी याचे ४ हजार ६४२ जण लाभार्थी होते. आता ही संख्या १६ हजार ५६६ पर्यंत गेली आहे. या योजनेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रका ४५ कोटी रूपयांची तरतूद आहे.

वार्षीक उत्पन्न १ लाखाच्या आत असलेल्या नागरिकांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ मिळतो. सर्वसामान्य उपचारासाठी एक लाखापर्यंत तर डायलेसिस व कॅन्सर, ह्रदयरोगावरील उपचारासाठी २ लाखापर्यंत महापालिकेकडून मदत केली जाते. यापूर्वी गंभीर रोगांसाठीही १ लाखाची मर्यादा होती, पण ही रक्कम अपुरी पडत असल्याने तिची मर्यादा २ लाखापर्यंत वाढवली आहे.

समाविष्ट गावात ही योजना लागू

पुणे महापालिका हद्दीत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि व सहा महिन्यापूर्वी समाविष्ट झालेली २३ गावांमधील नागरिकांनाही ही योजना लागू झाली आहे. या ३४ गावातील ३७ जणांनी योजनेचे कार्ड काढून घेतले आहेत.

" शहरातील आजच्या दृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना वैद्यकीय उपचारांचा खर्च परवडत नाही त्यांची ही गरज लक्षात घेऊन महापालिकेने शहरी गरीब योजना सुरू केली आत्तापर्यंत शहरातील 16 हजार पेक्षा जास्त कुटुंब या योजनेचे लाभार्थी झालेले आहेत. विशेषता डायलेसिस किमोथेरपी यासारख्या महागड्या प्रकारांसाठी या योजनेतून मदत केली जाते त्याचा नागरिकांना मोठा आधार मिळत आहे."

- डॉ. अंजली साबणे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

आजार आणि लाभार्थी संख्या

  • डायलिसीस - ८८२

  • केमोथेरपी -१०८०

  • म्युकरमायकोसीस - २१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samosa Health Risk : एका समोशासाठी द्यावे लागतील ३ लाख रुपये; डॉक्टरांनी सांगितले थेट हृदयाशी कनेक्शन

‘बाबो... जान्हवी परतली तनुजा बनून!’ लक्ष्मी निवास मालिकेतला खतरनाक ट्वीस्ट, जान्हवीचा स्मृतीभ्रश होणार?

Latest Marathi News Live Update : पावसाचा हाहाकार! शिरपूर तालुक्यात मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान

Work From Home Scam : ‘झुकती है दुनिया.. झुकानेवाला चाहिये’ म्हणत, ‘वर्क फ्रॉम होम’ दिलं अन् कोट्यवधींची केली फसवणूक, अगरबत्ती पॅकिंग घोटाळा

Saree Style Tips : साडी म्हणजे संस्कृती! सोनाली पाटीलने सांगितले, साडी का आहे तिचा 'सर्वांत कंफर्टेबल वेअर'?

SCROLL FOR NEXT