Startup
Startup 
पुणे

स्टार्टअप इनोव्हेशन सेलमधील सदस्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण

सकाळवृत्तसेवा

पुणे - नाविन्यपूर्ण सेवांचा शोध घेत त्या पुरविण्यासाठी नवीन स्टार्टअपची निर्मिती करणे, त्यासाठी आवश्यक विचार करण्याच्या कक्षा रूंदाविणे, याबाबत महाविद्यालयांत कार्यरत असणाऱ्या स्टार्टअप इनोव्हेशन सेलमधील सदस्यांसाठी मार्गदर्शनपर प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवउपक्रमांबद्दलची जाणीव होऊन सुरुवातीच्या टप्प्यावर स्टार्टअप्स तयार व्हावेत, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेस विभाग आणि आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने क्षमता बांधणीवरील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सेंटर फॉर इनोवेशनतर्फे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप इनोव्हेशन सेलची स्थापना करण्यात आली आहे. सध्या २७५ महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे स्टार्टअप इनोव्हेशन सेल कार्यरत आहेत. सेलमधील सदस्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. मिलिंद कांबळे यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. 

प्रशिक्षणात सहभागी प्राध्यापकांनी त्यांच्या महाविद्यालयांकरिता कृती योजना तयार केली आहे. दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून तीन ते पाच हजार संकल्पना पुढे येऊन त्यातील काहींचे रूपांतर स्टार्टअप मध्ये होऊ शकेल, अशी माहिती सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली. 

यावेळीआयआयटी मद्रासचे चिफ इनोव्हेशन ऑफिसर शिवा सुब्रमणियम, आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे प्राध्यापक डॉ. सत्य रंजन आचार्य, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनचे प्रमुख डॉ. बी. के. साहू, गुजरात टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन सेंटरचे संचालक हिरणमय मेहता यांनी मार्गदर्शन केले. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण, स्टार्टअप मधील व्यवसाय आणि शाश्वत स्वरूपातील स्टार्टअप इनोव्हेशन सेल कसे तयार करावे, या प्रमुख विषयांवर प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले.

'याप्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे महाविद्यालयांमध्ये शाश्वत स्वरूपातील स्टार्टअप इनोव्हेशन सेलची स्थापना करण्यास मदत होईल. त्यामुळे स्टार्टअप इनोव्हेशन सेलमधील विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढून त्यांचा आत्मविश्वास वाढू शकणार आहे. तसेच शिक्षकांमध्ये सकारात्मक बदल झाल्यास संपूर्ण शिक्षण पध्दतीमध्ये चांगला बदल घडून येऊ शकतो. "
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ   

'इनोव्हेशन स्टार्टअप सेल हा कसा असावा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आंत्रप्रिनरशिप आणि इनोव्हेशन सेल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे यातून समजले. विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे, हे जरी आपण शिकवत असू तरी इतरांपेक्षा वेगळा विचार कसा करावा हे सांगणारा हा सेल आहे."
- अर्चना जोशी, प्रमुख,  स्टार्टअप इनोव्हेशन सेल, एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT