ACCIDENT.jpg 
पुणे

पुणे-मुंबई मार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कार अपघातात दोन ठार

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत आडोशी जवळ भरधाव मोटार मार्गानजीक लोखंडी रेलींगला सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात वृद्ध पती पत्नींचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

मोतीलाल मोतीवाले (वय-७०), उषा मोतीवाले (वय-६५, रा. चकाला, मुंबई) असे मृत दांपत्याची नावे आहे. तर त्यांच्या सुनबाई मोहीनी मोतीवाले (वय-३०), खुशी (वय-१५), शान (वय-०२) अशी जखमींची नावे आहे.

मोतीवाले कुटुंब गावाहुन मुंबईला परतत असताना द्रुतगती मार्गावर आडोशीनजीक मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षक रेलींगला धडकडी यामध्ये मोतीवाले दांपत्याचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची माहीती मिळताच वाहतुक पोलिस,डेल्टा फोर्स व स्थानिक स्वयंसेवक तातडीने घटनास्थळी दाखल होत जखमींना पनवेल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

तीव्र उतार आणि वेगामुळे अपघातांना निमंत्रण- द्रुतगती मार्गावर आडोशी बोगदा सोडला तर तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर टायर फुटणे, चालकांचे नियंत्रण सुटणे त्याचबरोबर वाहनाचा अनियंत्रीत वेग यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मात्र सध्या आडोशी ते खालापूर दरम्यान सध्या अपघातांची मालीका सुरुच असून पंधरा दिवसात पाच जणांचा बळी गेला आहे. चार दिवसातील हा तीसरा अपघात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT