कारला अपघात sakal
पुणे

भवानी पेठेतील तुटक्या पावसाळी वाहिनीत कारला अपघात

पालिका प्रशासन सुस्त; आई व बाळ सुदैवाने बचावले..

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट, ः रस्ते आणि खड्डे पुणेकरांसाठी नवीन नाही. त्यामध्ये आता तुटक्या चेंबरची आणि रस्त्याच्या उंचीची भर पडली आहे. भवानी पेठेतील गुरुनानकनगर रस्त्यावर तुटक्या पावसाळी वाहिनीमध्ये चारचाकीला अपघात झाला. येथील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, चेंबर तुटले असून, रस्ता आणि चेंबरची उंची समतल नसल्यामुळे वाहने आदळून अपघात होत असल्याच्या घटना दैनंदिन घडत आहे.

असाच एक प्रसंग गुरुनानक नगर रस्त्यावर घडलं आहे. रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून तीन ठिकाणी पावसाळी चेंबरला झाकणे नव्हती. अनेक महिने नागरिकांकडून तक्रारी झाल्यानंतर फक्त दोन ठिकाणी झाकणे टाकण्यात आली. मात्र शंकरशेठहून गुरुनानकनगरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर झाकण टाकण्यात आले नाही. यावेळी रितिका जैन राहणार सॅलिस्बरी पार्क या चारचाकी गाडीतून आपल्या लहान बाळा सोबत प्रवास करीत होत्या.

पावसाळी चेंबरावर झाकण नसल्याने ते झाकण्यासाठी त्यावर दगडी व झाडांचा पाळा पाचोळा टाकण्यात आला होता. यावेळी महिला वाहन चालवीत असताना अंदाज न आल्याने गाडी खड्ड्यात जाऊन जोरात आदळल्याने आई व लहान बाळ हे दोघेही सुदैवाने बचावले . मात्र गाडीच्या चाकाचे नुकसान झाले असल्याचे महिलेने सांगितले. यावेळी वेळीच नागरिकांनी महिलेला मदत करत खड्ड्यातून गाडी बाहेर काढली. याप्रकरणी प्रशासनाच्या गैर सोयी बद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, रस्त्यावरील खड्डे आणि तुटक्या चेंबरमुळे वाहनांना दररोज दुचाकीचालकांना अपघात होत आहेत. या रस्त्यावर पालिकेने बसविलेले दिवे वारंवार बंद असतात, त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांबरोबर पादचाऱ्यांना कमालाची त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. रस्ते दुरुस्ती करताना खड्डे बुजविले जातात. मात्र, त्यामुळे रस्त्यापेक्षा खड्ड्यांची उंची जास्त झाली असल्याने तेथेही पुन्हा अपघात होत आहेत. प्रशासनामध्ये अभियंते असूनही तांत्रिक पद्धतीने रस्त्याची कामे का केली जात नाहीत, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. या रस्त्यावरचे खड्डे आता पावसाच्या पाण्याने भरले असून, गाडी चालवताना ते लक्षात येत नाही आणि गाडी त्यामध्ये आदळते. पालिका प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT