case file agist one theft of Expensive two-wheeler traveling along with girlfriend
case file agist one theft of Expensive two-wheeler traveling along with girlfriend 
पुणे

मैत्रिणींसाठी कायपण ! फिरायला घेऊन जाण्यासाठी चोरायचा महागड्या बाईक !

सकाळवृत्तसेवा

पुणे : तुम्ही तुमच्या मैत्रीणीचे लाड, हट्ट पुरविण्यासाठी काय कराल, तर तुम्ही तिला फिरायला, शॉपींगला घेऊन जाल किंवा एखादा रोमॅंटिक चित्रपट दाखवाला, पण एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला 'लाँग ड्राईव्ह'ला घेऊन जाण्यासाठी, तिच्यावर आपली स्वतःची छाप पडावी, यासाठी चक्क वेगवेगळ्या कंपन्यांच्या व महागड्या दुचाकी चोरीचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. या "मजनू'पर्यंत दत्तवाडी पोलिसांचे "लंबे हात' फक्त पोचलेच नाहीत, तर त्यांनी त्याच्याकडून चोरलेल्या पाच दुचाकीही जप्त केल्या.

सौरभ दत्तात्रय चोरगे (वय 20, रा. आंबेगाव पठार) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. सौरभने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनपूर्वी तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. परंतु लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. त्यास भरपूर मैत्रिणी आहेत. त्या मैत्रीणींवर आपली छाप पाडण्यासाठी तो विविध प्रकारे प्रयत्न करत असे. त्यापैकी काही मैत्रिणींनी फिरायला जाण्याची आवड होती. त्यामुळे सौरभला चांगल्या व महागड्या दुचाकींची गरज भासत होती. अखेर त्याने मैत्रिणींची फिरायला जाण्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी दुचाकी चोरीला सुरवात केली. एक, दोन नव्हे तर त्याने पाच दुचाकी चोरल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, चोरी केलेली दुचाकी घेऊन तो शिवदर्शन परिसरातील वसंतराव बागूल उद्यान कमानीपासून पुढे असलेल्या पुलावर थांबला होता. त्यावेळी तेथे चोरीची दुचाकी घेऊन एक तरुण थांबला असल्याची खबर गुप्त बातमीदाराने दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार कुंदन शिंदे व सागर सुतकर यांना दिली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार शिंदे व सुतकर यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी त्यांना सौरभ तेथे थांबल्याचे दिसले. त्यांनी त्यास अडवून दुचाकीबाबत विचारणा केली, त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा, त्याने दत्तवाडी व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT