Case Filed Against three in laws for harassment of married woman 
पुणे

विवाहितेच्या छळप्रकरणी बोपखेलमध्ये तिघांवर गुन्हा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बोपखेलमध्ये घडला. पती अनिल पाल (वय 34), सासू भागिरथी पाल (वय 67, दोघेही रा. गणेशनगर, बोपखेल), मावस सासरा सुरेंद्र पाल (वय 52, रा. पठारे वस्ती, बोपखेल) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

मौजमजेसाठी दुचाकी अल्पवयीन चोरट्याकडून पाच जप्त
फिर्यादी महिला सासरी नांदत असताना आरोपी पती मुलीची व घराची जबाबदारी घेत नसल्यावरून त्यांच्यात वाद झाले. पतीने पत्नीच्या पोटात लाथ मारून शिवीगाळ करीत त्यांचा छळ केला. लग्नानंतर माहेराहून काही पैसे, किमती साहित्य, कपडे आणले नसल्याने सासूने विवाहितेला शिवीगाळ केली. विवाहितेच्या मुलीच्या खर्चासाठी पैसे मागितले असता पतीने पैसे न देता त्यांच्याशी भांडण केले. यासह मावस सासऱ्याने घरी येऊन फिर्यादी महिलेला त्रास दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
फिर्यादीच्या पतीला व सासूलाही मानसिक त्रास दिला. फिर्यादीच्या पतीला वेड लागल्यानंतर तसेच सासूचे मानसिक तणावातून निधन झाल्यानंतर सासरची सर्व संपत्ती आपल्याला मिळेल, असा मावस सासऱ्याचा डाव असल्याचे फिर्यादीने फिर्यादित म्हटले आहे. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही पेशंट नाही, पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT