Crime_Fraud 
पुणे

गुंतवणुकीच्या आमिषाने पाऊण कोटींना घातला गंडा; १२ जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुरंदर आणि रायगडमध्ये जमीन खरेदीत गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्याच्या आमिषाने 75 लाख 43 हजार 625 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूडमधील एका खासगी कंपनीच्या संचालकांसह बाराजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीतेश कांतिलाल ठक्कर (वय 45, रा. वाकड) यांनी यासंदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक्‍सपॅट प्रोजेक्‍ट अँड डेव्हलपमेंट प्रा. लि. कंपनीचे संचालक सच्चिदानंद रामप्पा कांचन, संतोष बाळकृष्ण शेट्टी, नेनमूल भाटिया, लॅसेल व्हिक्‍टर डिसोझा, संतोष अलेक्‍झांडर बेंजामिन, वर्लिन डिसोझा, अर्पिल वाघमारे यांच्यासह बाराजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे स्थानिक कार्यालय पौड रस्ता परिसरात तर मुख्यालय बंगळूरमध्ये आहे.

रायगड जिल्ह्यातील कुडळी विले गावात गर्व व्हिलेज, रोहा परिसरातील पार्क व्ह्यू आणि पुरंदरमधील पांगारे गावात असलेल्या लावण्या पांगारे गावातील प्रकल्पात बंगल्यासाठी जमिनीची विक्री करण्यात येणार आहे. या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास दरमहा व्याज दिले जाईल किंवा त्यापोटी जमीन दिली जाईल, असे आमिष आरोपींकडून फिर्यादी यांना दाखविण्यात आले होते.

ठक्कर, त्यांची पत्नी आणि नातेवाइकांनी या प्रकल्पात 75 लाख 43 हजार 625 रुपये गुंतवले होते. त्यानंतर कंपनीकडून व्याज देण्यात आले नाही. तसेच जमीन देण्यास नकार देण्यात आला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT