पुणे

जुन्नर : लग्नाची वरात काढणे आले चांगलेच अंगलट

दत्ता म्हसकर

जुन्नर : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे घरासमोर लग्नाची वरातीचे आयोजन करून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पाच जणांचे विरुद्ध जुन्नर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

प्रतीक शिवाजी राऊत, विकास केरभाऊ सूर्यवंशी, प्रमोद हरिभाऊ शिंदे, उमाकांत सदाशिव भालेराव, अनिकेत मोहन बोऱ्हाडे सर्व रा. शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) अशी आरोपींची नावे असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
शिवाजी दादाभाऊ राऊत यांचे घरासमोर शिरोली येथील शिवाजी राऊत यांनी भाऊ प्राणिल याचे विवाहानिमित्त बुधवार (ता. ३ रोजी) घरासमोर रात्री वरातीचे आयोजन केले होते. यावेळी वरील आरोपीस दहा ते बारा अनोळखी व्यक्ती वरातीत नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवून सध्या कोरोना  विषाणूंचा प्रादुर्भाव वाढलेला असताना लोकांचे जीवितास धोका होऊन संसर्ग पसरण्याचे  कृत्य केले. तसेच विना मास्क व सोशल डिस्टंसिंग न पाळता लग्नाच्या वरातीचा कार्यक्रम केला असल्याची फिर्याद पोलीस नाईक निलेश सत्यवान कोळसे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव करत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT