A case has been registered against Milind Ekbote of All Hindu Front at Kondhwa police station 
पुणे

समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे  : कोंढवा येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या एका धार्मिक स्थळाला विरोध करताना धार्मिक भावना दुखविणे, जातीय दंगल भडविण्याच्या उद्देशाने भाषण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने याप्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मिलिंद रमाकांत एकबोटे (रा.शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सतीश काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून एकबोटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोंढवा येथे महापालिकेतर्फे धार्मिक स्थळ उभारले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने 4 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, संबंधित धार्मिक स्थळाला विरोध दर्शविण्यासाठी  एकबोटे व त्याच्या साथीदारांनी तेथे एकत्र येऊन भाषणे केली. संबंधित भाषणात एकबोटे याने जाणीवपूर्वक व हेतुपुरस्करपणे जातीय तेढ निर्माण होऊन मनुष्यहानी आणि वित्तहानी होईल, यादृष्टीने भाषणे केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशेषत: बेकायदेशीररित्या जमाव जमवून राष्ट्रीय एकात्मतेस बाधा येईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल वक्तव्य करून एका विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामी केली. संबंधित भाषणे दहशत माजविण्याचा हेतूने सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारित केले आहे. तसेच एक आक्षेपार्ह मजकुराचे पत्र पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. सतीश काळे यांनी फिर्याद दाखल करण्यात कायदेशीर मदत तोसीफ शेख, अ‍ॅड. क्रांती सहाणे, अ‍ॅड  दीप्ती काळे, अ‍ॅड.स्वप्नील गिरमे, अ‍ॅड.सुरज जाधव, अ‍ॅड.दीपक गायकवाड यांनी केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT