pune crime 
पुणे

पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या आवळल्या मुसक्या; वसुलीप्रकरणी साथीदारांसह गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळी घेऊन येणाऱ्या वाहनचालकांकडून पैसे वसूल केल्याप्रकरणी गुंड बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापुर्वीच आंदेकर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. 

याप्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय 65), सागर थोपटे (दोघे रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गौरव सिद्धू सारवाड (वय ,24 रा. संभाजीनगर, धनकवडी) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील नागझरी नाल्याजवळ अल्पना चित्रपट गृहासमोर बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा आहे. या दर्ग्यासमोरील मोकळ्या जागेत मासळी बाजार भरतो. या मासळी बाजारात दररोज मोठ्या प्रमाणात वाहने मासे घेऊन येतात. दरम्यान, आंदेकर व त्याच्या साथीदाराकडून तेथे अनाधिकृत वाहनतळ सुरू केला आहे. त्यांच्याकडून छापलेल्या पावत्या वाहनचालकांना देऊन त्यांच्याकडून पैसा वसूल करीत होते.

या भागात दररोज साडेतीनशे ते चारशे वाहने लावण्यात येतात. वाहनचालकांना धमकावून दररोज साडेतीन ते चार हजार रुपये खंडणी स्वरुपात उकळण्यात आले. दरमहा बेकायदा वाहनतळातून एक लाख रुपये आंदेकर आणि साथीदार उकळत होते, असे सारवाड याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा समर्थ पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, व्यापारी पेठेत दहशत तसेच एका तरूणाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडू आंदेकरसह साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT