Toing 
पुणे

चारचाकी टोइंग करून नेत असल्यानं तरुणांची सटकली; कर्मचाऱ्यांवर केली दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या चारचाकी टोइंग करून नेत असल्याचे पाहून सहा जणांच्या टोळक्‍याने टोइंग व्हॅनमधील कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला अपशब्द वापरले. बुधवारी (ता. 6) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथील ऑरबीट मॉलसमोर हा प्रकार घडला.

दगडफेक करणाऱ्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक वंदना संजय आल्हाट (वय 42) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विश्रांतवाडी वाहतूक विभागात पोलिस नाईक म्हणून नेमणुकीस आहेत.

बुधवारी दुपारी त्या आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी नो पार्किंगमधील चार चाकी गाड्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीजवळ येऊन त्यांना शिवीगाळ केली. तसेच बेकायदेशीररीत्या जमाव जमवून फिर्यादी यांच्या टोइंग व्हॅन आणि सहकाऱ्यांवर दगडफेक तसेच धक्काबुक्की केली. त्यामुळे आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश अनेचा करीत आहे.

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Flood : कोल्हापूर-सांगलीत मुसळधार! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती; पाहा यंदाचा पहिला 'दक्षिण द्वार सोहळा', भाविकांची अलोट गर्दी

IND vs ENG, 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचा फलंदाजी क्रमांक बदलणार, तर बिश्नोई संघातून आऊट? कशी असू शकते भारताची प्लेइंग-११

Pune Solapur Highway: २१ कोटींचा रस्ता पुन्हा उखडला! पालखीला अवघे तीन दिवस; पुणे-सोलापूर महामार्गावर खडी, खड्डे अन् अपघातांचा धोका..

Latest Marathi News Update : खडकवासला ८१ टक्के भरले, मुठा उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू

Pune Water: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसीची भर, वेगाने वाढतोय जलसाठा

SCROLL FOR NEXT