Pune Bypoll Election  Esakal
पुणे

Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणुकीच्या तोंडावर पटोलेंना मांजर आडवी; शहराध्यक्षांनी...

चिंचवड पोटनिवडणुकबाबत चर्चा करायला नाना पटोले पुण्यात काँग्रेस भवनात आले

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे ती पुण्यातील पोटनिवडणुकांची. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका लवकर पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी इतर पक्ष आणि भाजप वारंवार बैठका घेताना दिसून येत आहेत. अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मांजर आडवी जाणे हा अशुभ संकेत मानला जातो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशुभ संकेत होण्याची नेमकी भिती काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वाटली तर नाही ना असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार पुण्यात घडला आहे. नाना पटोले यांना मांजर आडवी जाऊ नये यासाठीचा पुणे शहराध्यक्षाची धावपळ कॅमे-यामध्ये कैद झाली आहे.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकबाबत चर्चा करण्यासाठी नाना पटोले पुण्यात काँग्रेस भवनात आले होते. तिथे त्यांच्या स्वागतासाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि इतर पदाधिकारी गेटवर जाऊन थांबले. तिथे एक मांजर आली होती. ती पटोलेंना आडवी जाऊ नये म्हणून अरविंद शिंदेंनी तिला तिथून हाकलून लावलं.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीकरिता भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT