jejuri 
पुणे

सोमवती असूनही जेजुरीत उधळला नाही भंडारा...

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : खंडोबाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, यात्रेनिमित्त होणारे पारंपारिक विधी आज सकाळी जेजुरी गडावर पार पडले. काही मोजक्याच पुजारी, सेवक व मानकरी यांच्या उपस्थितीत खंडोबाचे सोमवती स्नान, पूजा, अभिषेक आदी विधी पार पडले. भाविकांविना व भंडाऱ्याविना प्रथमच यंदा सोमवती यात्रा पार पडली.

सोमवारी अमावस्या आली की जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भरते. यात्रेनिमित्त राज्यभरातून भाविक येत असतात. आज दिवस भर अमावस्या असल्याने भर सोमवती यात्रा होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवती यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, खंडोबाचे सोमवतीनिमित्त होणारे धार्मिक विधी काही मोजक्याच पुजारी, सेवक, मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडले. आज सकाळीच सहा वाजता दही, दुध व कऱ्हेच्या पाण्याने स्नान करण्यात आले. पूजा व अभिषेक करण्यात आला. या वेळी मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सुधीर गोडसे, कृष्णा कुदळे, जालिंदर खोमणे, संतोष खोमणे, अशोक खोमणे, सुधीर गोडसे, अमोल शिंदे, अविनाश सातभाई, मयूर दिडभाई, मुन्ना बारभाई आदी मोजकेच मानकरी, पुजारी व सेवकांच्या उपस्थितीत विधी पार पडला.

यानिमित्त गाभाऱ्यामध्ये फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांसाठी मात्र मंदीर बंदच ठेवण्यात आले होते. भाविकाविना सोमवती यात्रा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोमवतीचा पालखी सोहळा पाहण्यासारखा असतो. या शिवाय कऱ्हा नदीवर सोमवती स्नानाचा कार्यक्रमही जल्लोषपूर्ण असतो. भंडाऱ्याची उधळण आणि भाविकांचा उत्साह यंदा मात्र पाहण्यास मिळाला नाही. कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, असे साकडे या वेळी खंडोबाला घालण्यात आले. देवसंस्थानच्यावतीने आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या. शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT