Center committee will take review of corona Situation in pune
Center committee will take review of corona Situation in pune 
पुणे

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा केंद्रीय पथक घेणार आढावा

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्युचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने गुरुवारी पुण्यातील लसीकरण केंद्र आणि कोविड केअर सेंटरची पाहणी केली. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यात लसीकरण जास्त होत असल्यामुळे लशींचा पुरेसा साठा मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केंद्रीय पथकाकडे केली आहे. 

केंद्रीय पथकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्या, बाधित रुग्णांची संख्या, मृत्यूदर, रुग्णालयांमधील उपलब्ध खाटा, ऑक्सिजन औषधांचा साठा आणि मनुष्यबळ याची माहिती पथकाला देण्यात आली. महापालिका, जिल्हा परिषद, पोलिस दल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर केंद्रीय पथकाने शहरातील लसीकरण केंद्र आणि कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. येथे कशाप्रकारे चाचणी केली जाते. सध्या किती रुग्ण भरती आहेत, त्यांना लक्षणे आहेत का, याबाबत माहिती घेतली. हे पथक तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून, जम्बो सेंटर आणि रुग्णालयांना भेटी देणार आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हे वाचा - नऱ्हे येथे कोविड सेंटर आजपासून सुरू; वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, पुण्यात सोमवारी सुमारे ८५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मंगळवारी ५३ हजार तर बुधवारी ५५ हजार नागरिकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात सुरवातीला केवळ १६ लसीकरण केंद्रे होती. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात पाचशे लसीकरण केंद्रे आहेत. लसीकरण केंद्रे आणखी वाढविण्याची तयारी असून, मनुष्यबळ उपलब्ध आहे. परंतु लशींचा साठा मर्यादित असल्यामुळे क्षमता असूनही अडचणी येत आहेत. त्यामुळे पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय पथकाकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: किरकोळ बाजारात तूरदाळीचे दर दहा टक्क्यांनी वाढले

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

SCROLL FOR NEXT