center moved to another place in One night at the wagholi
center moved to another place in One night at the wagholi 
पुणे

एका रात्रीत केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलवले, नेत्यांचा वाद लोकांच्या जीवावर

निलेश कांकरिया

वाघोली : वाघोलीत(Wagholi) सध्या लोकप्रतिनिधींमध्ये लसीकरणावरून (Vaccination) सुरू असलेला वाद नागरिकांच्या जीवाशी येऊ लागला आहे. बी. जे. एस. (B.J.S.) येथील लसीकरण केंद्र(Vaccination centre) एका रात्रीत प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. लसीकरणासाठी ना पुरेशी खोली, ना लस घेल्यानंतर ऑब्झर्वेशनसाठी पुरेशी जागा, ना वेटिंग साठी पुरेशी जागा, ना पार्किंग साठी पुरेशी जागा अशी स्थिती प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) असतानाही ते बी जे एस येथून हलविण्यात आले. यामुळे नागरिकांना पायपीट तर करावीच लागली शिवाय भर उन्हात उभे राहण्याची वेळ आली.

वाघोली येथील बी.जे. एस.च्या सुमारे 8 ते 10 हजार चौरसफूट हॉल मध्ये हे केंद्र चार महिन्यापासून सुरू होते. सुमारे 17 हजारा पेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले. वैटिंग साठी भरपूर जागा, लसीकरणाची वेगळी खोली, लसीकरणानंतर ऑब्झर्वेशन साठी स्वतंत्र हॉल, डॉक्टर व स्टाफ साठी स्वतंत्र रूम, साहित्यासाठी स्वतंत्र रूम, पार्किंग साठी भरपूर जागा अशी सुविधा असतानाही हे केंद्र केवळ लोकप्रतिनिधिनच्या वादातून हलविण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सोसायटी मध्ये लसीकरण केल्याच्या प्रकारणानंतर हा वाद सुरू झाला. या वादातूनच केंद्र हलविण्याचा प्रकार झाला. आपण नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे भानही लोकप्रतिनिधींना राहिले नाही. लोकप्रतिनिधींच्या या वादाला अधिकारीही बळी पडत आहे.

पॉझिटिव्हीटी वाढली तर जबाबदार कोण

प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी येतात. लसीकरण केंद्र येथे हलविल्यामुळे गर्दीत वाढ होणार आहे. शिवाय रुग्ण व लसीकरणासाठी आलेले नागरिक यांच्यात संपर्क येण्याची शक्यता आहे. यामुळे पॉझिटिव्हीटी दर वाढू शकतो. याला जबाबदार कोण

एकाच ठिकाणी गर्दी

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्टहाउस मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे दोन खोल्या आहेत. लसीकरण स्टाफला बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. लसीकरणानंतर नागरिकांना ऑब्झर्वेशनसाठी साठी बसण्याचीही जागा नाही. गेस्ट हाऊस समोर वैटिंग करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने सोशल डिस्टंसिंग फज्जा उडत आहे. याच जागेत छोटा मांडव टाकण्यात आला आहे. यामुळे काही नागरिक भर उन्हात उभे होते. बसण्यासाठी पुरेशी जागाही नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात चार चाकी येण्यासाठी पुरेसा रस्ताही नाही. यामुळे वृद्ध व्यक्तीला महामार्गावरून तेथून चालत आणण्याची कसरत करावी लागणार आहे. पार्किंग साठी जागा नसल्याने भर पुणे नगर महामार्गावर वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार आहे.

सुविधा न पाहता हलविलेच केंद्र कसे?

लसीकरणासाठी दररोज 300 ते 400 नागरिक येतात. एवढ्या संख्येने नागरिक येत असताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छोट्या जागेत त्याची व्यवस्था होईल का याची पाहणी न करताच हे केंद्र हलविण्याचा निर्णय कसा एका रात्रीत घेण्यात आला.

''...म्हणून केंद्र हलविले'' - आयुष प्रसाद

आय सी एम आर च्या नियमा नुसार ज्या जागेत केंद्राची मान्यता आहे त्याच जागेत सेन्टर सुरू ठेवता येते. वाघोलीचे केंद्राचे ठिकाण प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने ते तेथे हलविले. बी जे एस येथे सुरू करण्यात आलेले केंद्र मान्यतेचे नव्हते. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्र दिल्यास तेथेही मान्यता घेऊन स्वतंत्र केंद्र सुरू करता येईल.असे ही ते म्हणाले

आयुष प्रसाद या प्रश्नांची उत्तरे देतील का?

  1. चार महिने बी. जे. एस.ला केंद्र कसे सुरू राहिले ?

  2. त्यावेळी आय. सी. एम. आर.चा नियम नव्हता का

  3. ज्या ठिकाणची मान्यता आहे त्या जागेत केंद्र सुरू आहे हे अधिकाऱ्यांना माहिती नव्हते का?

  4. प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यापूर्वी तेथील जागेचा आढावा घेतला का ?

  5. लसीकरणासाठी होणारी गर्दी व प्राथमिक आरोग्य केंद्राची छोटीशी जागा याचा अंदाज घेतला का ?

  6. प्राथमिक आरोग्य केंद्रात जर सेन्टर ला मान्यता असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्टहाउस मध्ये कसे सेन्टर सुरू केले? ते नियम बाह्यय नाही का ?

  7. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागे अभावी सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडत आहे. त्यामुळे रुग्ण वाढले तर जबाबदार कोण ?

  8. चार महिने मान्यता नसलेल्या ठिकाणी केंद्र चालविले ते नियम बाह्यय होते मग अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?

" माझे अधिकार घ्या मात्र नागरिकांच्या जीवाशी असे राजकारण करून खेळू नका. केंद्र हलवताना मलाही विचारण्यात आले नाही. ही राजकारण करण्याची वेळ नाही. वॉर्डनियाह सेन्टर सुरू करून लसीकरण वाढवा. तशी मागणी मी केली आहे. माझ्यासाठी नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. एका रात्रीत सेन्टर हलविणे यामागे केवळ घाणेरडे राजकारण असून पुरेशी जागा नसतानाही तेथे सेन्टर सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू करण्यात आला आहे. "-

- ज्ञानेश्वर कटके, जिल्हा परिषद सदस्य.

" मी पुरेश्या मोठ्या जागेत जिथे नागरिकांची सर्व व्यवस्थित सोय होईल आशा ठिकाणी केंद्र सुरू ठेवा असे सांगितले होते. त्यासाठी शासनाची परवानगी पाहिजे असेल तर घ्या असेही सांगितले होते. मात्र तेथे छोट्या जागेत का केले हे अधिकाऱ्यांना विचाटावे लागेल."

- आमदार अशोक पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT