पुणे

शर्यतबंदी उठविण्यासाठी केंद्राने संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैल प्राण्यास वगळावे : डॉ. अमोल कोल्हे

डी. के. वळसे पाटील

मंचर  : पुणे-बैलगाडा शर्यत बंदीमुळे खिलार जातीच्या देशी वंशाच्या बैलांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी नॅशनल अॅनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक लवकर बोलवावी, अशी मागणी  शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे नवी दिल्ली येथे केली. 

मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदीला बैलगाडा मालक संघटना व महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींसाठी वापरला जाणारा बैल हा खिलार जातीचा देशी गोवंश असून त्याचा शेतीकामासाठी त्याचा वापर होत नसल्याकडे केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांचे लक्ष वेधले आहे.

डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात वस्तुस्थिती नमूद करताना, केवळ शर्यतींसाठी वापरण्यात येणारा खिलार बैल सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलाची कमी दराने बेकायदा कत्तलीसाठी रवानगी केली जाते. त्यामुळे खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून भविष्यात ही देशी बैलांची जात नष्ट होण्याचा धोका व्यक्त केला आहे. 

खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचविण्यासाठी बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठणे आवश्यक आहे. त्यासाठी बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने अॅनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक बोलावून या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भूस्खलन, ७ जणांचा मृत्यू, २७ जण अडकले; मिथेन गॅसचा स्फोट, बचावकार्यात अडथळे

Cricketer Arrest: क्रिकेटविश्वात खळबळ! दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; हायकोर्टाचे तात्काळ अटकेचे आदेश

Live Updates Marathi : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेत आंदोलन

Samruddhi Accident: सोडण्यासाठी गेले, ते कायमचेच सोडून गेले! बहीण, आई-वडीलांचा मृत्यू, आता घरात तन्वी एकटीच

Lionel Messi: मेटलाइफ स्टेडियम मेस्सीसाठी दुर्दैवी; कोपा अमेरिकापाठोपाठ विश्वकरंडक स्पर्धेतही अपयश

SCROLL FOR NEXT