CRPF-Jawan
CRPF-Jawan 
पुणे

Video : 'सीएपीएफ'च्या जवानांची पहिली तुकडी पुण्यात दाखल!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे 69 क्षेत्र प्रतिबंधित (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या क्षेत्रातून शहरात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना बाहेर फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही अनेक नागरिक बाहेर फिरताना दिसून येतात. त्यामुळे या भागात आता रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. या जवानांची एक तुकडी शुक्रवारी (ता.१५) पुण्यात दाखल झाली. यावेळी तुकडीने शहरातील सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर परिसरातून रूटमार्च काढला.

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे, यासाठी हा रुटमार्च काढण्यात आला.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (सीएपीएफ) १२० जवानांची एक तुकडी पुणे शहरात दाखल होणार असल्याचे सूतोवाच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी (ता.१३) दिले होते.  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन काळात पोलिस दल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तात अडकलेले आहे़. तर राज्यात सुमारे एक हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे़. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलिसांना क्वॉरंटाईन करावे लागले आहे़. तसेच ५५ वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून रजा देण्यात आली आहे़. त्यामुळे उरलेल्या पोलिस दलावर बंदोबस्ताचा मोठा ताण आला आहे. दीड महिन्याहून अधिकच्या बंदोबस्तामुळे पोलिसांची दमछाक झाली आहे.

त्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आणि आगामी रमजान ईद सण जवळ आल्याने पोलिसांच्या मदतीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० तुकड्यांची मागणी केंद्राकडे केली होती. सीएपीएफच्या काही तुकड्या मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत.

पोलिसांच्या मदतीसाठी सीएपीएफच्या १२० जवानांची तुकडी पुणे शहराला मिळाली असून ही तुकडी पुणे पोलिसांना बंदोबस्तासाठी साहाय्य करेल, अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT