पुणे

उद्योगांना ऑक्सिजन पुरविण्यास केंद्राची परवानगी; राज्याची आडकाठी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे, तरीही उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा न वाढविल्यामुळे उद्योग मेटाकुटीला आले आहेत. उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने चार दिवसांपूर्वी परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभाग आणि आरोग्य विभागाकडून अद्याप त्या बाबत प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे २० टक्के ऑक्सिजनवर किती दिवस काम करायचे?, असा प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केला आहे. (central government permission to supply oxygen to industries)

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे राज्य सरकारने एप्रिलपासून उद्योगांचा ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्राकडे वळविला. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आणि ऑक्सिजन शिल्लक राहू लागल्यामुळे राज्य सरकारने २० टक्के ऑक्सिजन उद्योगांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय ३ जून रोजी घेतला. मात्र, त्यानंतरही पुणे आणि परिसरातील रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे उद्योगांसाठीच्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल, अशी उद्योजकांची अपेक्षा होती. परंतु, अद्यापही त्याबाबत निर्णय झालेला नाही. या बाबत उद्योजकांनी विभागीय उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, अन्न व औषध प्रशासनातील सहआयुक्त एस. बी. पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनीही या बाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या मार्फत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. परंतु, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

कशासाठी लागतो ऑक्सिजन

प्लेट कटिंग, लेझर कटिंग, प्रोफाईल कटिंग, फॅब्रिकेशन, मटेरिअल हॅन्डलिंग, स्पेशल पर्पज मशिन आदींच्या कामांसाठी उद्योगांना रोज ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजनला पर्याय म्हणून एअर कॉम्प्रेसरचा वापर काही ठिकाणी होऊ लागला, तरी त्याला मर्यादा आहेत. परिणामी पुरवठा साखळीवरही परिणाम होऊ लागला आहे.

ऑर्डर, कामगार वाढले तरी...

लॉकडॉउनचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे उद्योगांमध्ये ऑर्डर वाढू लागल्या आहेत. तसेच, मनुष्यबळही पुरेसे उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे कामांना वेग येऊ लागला आहे. परंतु, ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे उद्योगांना अडचणी येऊ लागल्या आहेत. पुरेसे काम नसल्यामुळे काही कंपन्यांत कामगारांना बसवून ठेवावे लागत असल्याचेही चित्र आहे.

ऑक्सिजन मागणी घटली

एप्रिल- मेमध्ये पुण्यात ऑक्सिजनची मागणी प्रती दिन ३८१ मेट्रिक टनांपर्यंत पोचली होती. परंतु, सध्या ही मागणी १६० टनांच्या आसपास आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची मागणी घटली आहे. हा ऑक्सिजन उद्योगांना मिळाल्यास त्यांच्या कामाला वेग येईल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

संदीप बेलसरे (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटना) : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे उद्योगांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे करीत आहोत. परंतु, राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत काय करायचं? राज्य सरकारच्या विलंबाचा फटका उद्योगांना बसत आहे.

सदाशिव सुरवसे (विभागीय उद्योग सहसंचालक) : ऑक्सिजनबाबत केंद्र सरकारने नव्याने आदेश दिला आहे. आता राज्य सरकारचाही आदेश लवकरच येईल. उद्योगांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, येत्या आठवड्यात उद्योगांना पुरेसा ऑक्सिजन मिळेल. मात्र, वैद्यकीय क्षेत्रासाठी ऑक्सिजनला सध्या प्राधान्य द्यावे लागेल. त्यानंतर उद्योगांना ऑक्सिजन उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident: कारच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू; जबलपूर मार्गावर भीषण अपघात, कांद्रीत संतप्त नागरिकांचा रस्ता रोको

Smriti Mandhana Sangeet: तेनु लेके मैं जावांगा... स्मृती-पलाशचा रोमँटिक डान्स; तर जेमिमाहसह महिला क्रिकेटपटूंनीही धरला ठेका

Latest Marathi News Live Update: : उल्हासनगरमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांची रिक्षाचालकाला मारहाण

Sangli Gunfire On Friend : दुचाकीवरून जाताना सहकारी मित्रानेच पाठीमागून खट् खट् खट्...गोळ्या झाडल्या, पुढं काय घडलं...; पुणे-बंगळूर हायवेवर थरार

Baba Vanga Predictions : बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी! तुमच्यासोबत २०२६ सालात घडणार मोठ्या घटना; कुणाला मोठं नुकसान तर कुणाला फायदा

SCROLL FOR NEXT