CET Exam Sakal
पुणे

तांत्रिक अडचण आल्याने ‘सीटीईटी’ परीक्षा पुढे ढकलली

परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान देशभरातील विविध शहरांमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती.

मीनाक्षी गुरव

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) (CBSE) गुरुवारी झालेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (सीटीईटी) (CET Exam) तांत्रिक अडचणींमुळे (Technical Problem) उमेदवारांना दुसऱ्या सत्रातील पेपर देणे शक्य न झाल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. सीटीईटी परीक्षेतील गुरुवारी दुसऱ्या सत्रातील पेपर दोन रद्द (Paper Cancel) करण्यात आला. आता गुरूवारच्या दुपारच्या सत्रातील पेपर दोन आणि शुक्रवारच्या दोन्ही सत्रातील (पेपर एक आणि पेपर दोन) हे पुढे ढकलण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांना लवकरच पुढील परीक्षेचे वेळापत्रक कळविण्यात येईल, असे ‘सीबीएसई’ने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

सीबीएसईने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस लिमिटेड या कंपनीकडे सोपवली होती. ही परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान देशभरातील विविध शहरांमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती. दरम्यान, ‘सीटीईटी परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’ने १६ डिसेंबर रोजी घेतलेल्या सीटीईटी परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना परीक्षा देता न आल्याची बातमी शुक्रवारी प्रसिद्ध केली. त्यानंतर ‘सीबीएसई’ने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परिपत्रकाद्वारे दिली.

दरम्यान, परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १६ डिसेंबरला पहिल्या सत्रातील पेपर सुरळीतपणे पार पडला. परंतु दुपारनंतर अचानकपणे आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्या सत्रातील पेपर दोन घेणे शक्य झाले नाही, असे टीसीएस लिमिटेडने सीबीएसईला कळविले आहे. या तांत्रिक बिघाडामुळे १६ डिसेंबर रोजी पूर्वनियोजित दुसऱ्या सत्रातील पेपर दोन आणि १७ डिसेंबर रोजी होणारे दोन्ही पेपर (पेपर एक आणि पेपर दोन) पुढे ढकलण्यात आले आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेचे माहिती संबंधित उमेदवारांना येत्या काही दिवसांत कळविली जाणार आहे, असे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे. तर परीक्षेत आलेल्या तांत्रिक अडचण सोडविण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे टिसीएसमार्फत सांगण्यात आले आहे.

सीटीईटी परीक्षेतील पुढील सत्र येत्या सोमवारपासून (ता.२०) पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहे. संबंधित उमेदवारांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रावर पोचवावे, असे आवाहन सीबीएसईमार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Satara News: सातारकरांचाही परदेशी ओढा! जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय वाहन परवाना मागणीत वाढ; प्रादेशिक कार्यालयातून तब्‍बल १३३ जणांची प्रक्रिया..

Video Viral: अरर... मुंबई इंडियन्सचा फॅन स्टेडियममध्ये गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला, पण अंगठीच हरवली अन् फजिती झाली

ही होती पहिला किसिंग सीन देणारी भारतीय अभिनेत्री; दिग्दर्शक नवऱ्याला फसवून सिनेमाच्या हिरोसोबत गेली पळून

झी मराठीच्या 'लक्ष्मीनिवास' आणि 'सावल्याची जणू सावली' मालिकांची वेळ बदलणार; कधी पाहता येणार? प्रेक्षक मात्र नाराज

SCROLL FOR NEXT