chakan 
पुणे

पुण्यात अडकलेत कामगार...यूपी, बिहार, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना कोण समजवणार? 

हरिदास कड

चाकण (पुणे) : औद्योगिक वसाहतीत काम करणारे परप्रांतीय कामगार व मजूर कोरोनाच्या मूळगावी निघाले आहेत. त्यांचे ऑनलाइन अर्जही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. याद्या तयार आहेत. राज्य सरकार त्यांना त्यांच्या राज्यात रेल्वेने पाठविण्यास तयार आहे. पण, त्यांच्या राज्यातील मुख्यमंत्री त्यांना घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे 15 हजार मजूर त्यांच्या गावी जाऊ शकत नाहीत. 

खेड तालुक्‍यातील चाकण औद्योगिक वसाहतीत परराज्यातील दीड लाखांवर कामगार, मजूर काम करत आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, ओरिसा, कर्नाटक व इतर राज्यातील कामगार रेल्वेने, खासगी बसने, एसटीने तसेच पायी गेले आहेत. अजूनही काही पायी निघत आहेत.

उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यात जाणाऱ्या कामगारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यांच्या याद्या तयार आहेत. रेल्वे तयार आहे, पण तेथील मुख्यमंत्री त्यांना राज्यात घेण्यास तयार नाहीत. महाराष्ट्र सरकारला ते प्रतिसादही देत नाहीत. त्यामुळे त्यांनी आता काय करायचे, हा प्रश्‍न राज्यासमोर पडला आहे. 

याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले की, परप्रांतीय कामगार भीतीमुळे त्यांच्या राज्यात जात आहेत. त्यांच्या राज्यात त्यांना पाठविण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी परप्रांतीयांच्या पाठवणीबाबत चर्चा केली आहे. पण, संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद येत नाही. परप्रांतीय कामगार गावी गेल्याने कंपन्या सुरू होऊनही त्यांना कामगार मिळत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या राज्यात जाऊ नये. येथे कंपन्यांत काम करावे. सरकार त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेईल.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT