Pune-International-Film-Festival 
पुणे

चित्रपटांमध्ये नवनिर्मितीचे आव्हान - आर. बाल्की

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘चित्रपट हे शक्तिशाली माध्यम आहे. सध्या लोकांच्या आयुष्यातच लक्षवेधी आणि विचित्र गोष्टी घडत आहेत. अशा परिस्थितीत वेगळेपण जपून नवनिर्मिती करणे हे लेखक, दिग्दर्शकांपुढील आव्हान आहे,’’ असे मत दिग्दर्शक आर. बाल्की यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात डॉ. जब्बार पटेल यांनी आर. बाल्की यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. तेंडुलकरांविषयी बाल्की म्हणाले, ‘‘तेंडुलकर हे खूप धाडसी लेखक होते. ते त्यांचे विचार मांडायला कधी घाबरले नाहीत. बाहेरच्या जगात अशांतता, गोंधळ असतानाही तो त्यांना कधीच अशांत करू शकला नाही. त्याचा वापर त्यांनी आणखी कलात्मक निर्मितीसाठी केला.’’

मला चित्रपटाच्या आकृतिबंधाला चिकटून राहायला आवडत नाही, तर कथाच महत्त्वाची वाटते. तुमच्याकडे जर सांगण्यासारखे काही नसेल तर चित्रपट बनवण्यात अर्थ नाही, असे सांगत चीनी कम, पा, पॅडमॅन, मिशन मंगल या चित्रपटांचे काही किस्से त्यांनी सांगितले. एका प्रकारच्या प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवत आहे, असे सांगणे मला चुकीचे वाटते. कारण जेव्हा असे कोणी म्हणते, त्यांना त्या गटातील प्रेक्षकांना काय हवे आहे, काय आवडू शकेल, हे कितपत समजलेले असते, याविषयी शंका आहे. जेव्हा कथा, संहिता लिहिली जाते आणि ती चित्रपटातून बाहेर प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही, तोवर हे दावे मला अतिशयोक्तीचे वाटतात, असे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, इलियाराजा यांचे संगीत मला फार भावते. ते ऐकताना एखादी कथा किंवा कथेतील घटना सुचते. त्यांच्या संगीतात पूर्ण सिनेमा आहे, असे मला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT