Pune Weather Update sakal
पुणे

Pune Weather Update : पुण्यात हलक्या पावसाची शक्यता

उन्हाच्या चटक्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात येत्या शुक्रवारपासून (ता. ५) पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असल्याने उन्हाच्या चटक्यातून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उन्हाच्या चटक्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात येत्या शुक्रवारपासून (ता. ५) पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असल्याने उन्हाच्या चटक्यातून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातही येत्या रविवार (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला.

राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. सर्वाधिक तापमान ब्रम्हपूर येथे ४२.३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. राज्यातील प्रमुख ३० पैकी १४ शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला आहे.

पुण्यात दोन दिवसांपासून कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

शिवाजीनगर येथे अवघ्या ४८ तासांमध्ये किमान तापमानाचा पारा ३.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा २२.४ वरून १८.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला.

शहर आणि परिसरात पुढील चार दिवस म्हणजे शनिवारी (ता. ६) दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहून दुपारनंतर आकाश ढगाळ होईल. त्यानंतर रविवार आणि सोमवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT