Chandani Chauk sakal
पुणे

Chandani Chowk Traffic: चांदणी चौकात आज पुन्हा 'ट्रॅफिक ब्लॉक'

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील चांदणी चौक पाडल्यानंतर या परिसरात आज दुपारी पुन्हा 'ट्रॅफिक ब्लॉक' असणार आहे. यासंदर्भातील माहिती पुणे वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे. पुलाच्या बाजूचा खडक फोडण्याचे काम बाकी असल्यामुळे आज दिवसभरातून २ वेळा या मार्गावरील वाहतूक २० मिनिटे बंद केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(Pune Chandani Chowk Traffic Latest Updates)

खडक फोडण्याचे काम ब्लास्ट पद्धतीने होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक २० मिनिटे बंद केली जाईल. दुपारी १ ते २ दरम्यान २०० मीटर लांब गाड्या २० मिनिटासाठी थांबवल्या जातील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले सर्व्हिस रोड लवकरात लवकर सुरु व्हावेत यासाठी हे खडक फोडण्याची गरज आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्यात येत आहे. तर दुपारच्या दरम्यान काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हा पूल पाडण्यात आला असून आता रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडक असल्यामुळे ब्लास्ट करून या खडकाला फोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत पुणेकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT