Chandani Chauk sakal
पुणे

Pune News : 'या' 9 कारणांसाठी चांदणी चौकातील पुलाला धन्यवाद म्हटलंच पाहिजे

वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेला चांदणी चौकातील पुल अखेर आज मध्यरात्री पाडला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Chandani Chowk Bridge Demolish Today : वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेला चांदणी चौकातील पुल अखेर आज मध्यरात्री पाडला जाणार आहे. तो बांधला गेल्यानंतर जेवढी चर्चा झाली नव्हती. तेवढी तो पाडण्यावेळी झाली. मात्र, या पुलाला अखेरचा दंडवत करण्यापूर्वी या पुलाचे पुणेकरांना अनेक फायदेदेखील झाले आहेत. त्यामुळे हा पुल पाडण्यापूर्वी पुणेकरांनी एकदा तरी धन्यवाद म्हटलेच पाहिजे. 1992-1993 मध्ये या महामार्गाचे काम झाल्यानंतर त्याच वेळी हा पुल बांधण्यात आला होता.

चांदणी चौकाचे होते हे फायदे

  • या पुलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शहरातील उत्तर आणि दक्षिण विभाग या पुलामुळे जोडला गेला.

  • या महामार्गामुळे वाहतूक डायव्हर्ट होण्यास मदत झाली. मात्र, दुसरीकडे या पुलावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली.

  • बांधण्यात आलेल्या या पुलामुळे मुंबईला जाणाऱ्यांसाठी वाहतूक करणे तसेच दळण वळण सोपं झालं.

  • महामार्गावरील या पुलामुळे त्या भागातील नागरिकांना लवकर महामार्गवरुन दुसऱ्या भागात जाण्यास मदत झाली. तसेच वेळ आणि पेट्रोलची बचत झाली.

  • मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा लोणावळा, पुणे, सातारा, कोल्हापूर अशी अनेक शहराने जोडला गेला आहे. या पुलामुळे बावधनकडून येणारी वाहतूक कोथरूड, एन डी ए, मुळशीकडे जाण्यासाठी सुरळीत झाली.

  • पुलाच्या बांधकामामुळे कोथरूड, बावधन हे शहरातील मोठे भाग विकसित झाले.

  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, रस्ता ओलांडण्यासाठी हा पुल उपयुक्त ठरला होता.

  • महामार्गाकडून आलेल्या वाहतूक डिव्हाईड करण्यासाठी हा पुल महत्त्वाचा मानला जात होता.

  • तर, चांदणी चौक परिसरात राहणाऱ्या अनेक पादचाऱ्यांसाठी हा पुल जाण्या येण्याचा रोजचा मार्ग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT