nitin gadkari  esakal
पुणे

Chandni Chowk Flyover: तीन पैकी दोन गोष्टी पूर्णत्वास गेल्याचा आनंद; नितीन गडकरींकडून चांदणी चौक पुलाचे लोकार्पण

Chandni Chowk Flyover: रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांदणी चौक पुलाचं लोकार्पण करण्यासाठी पुण्यात आले आहेत

सकाळ डिजिटल टीम

पुणे- रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांदणी चौक पुलाचं लोकार्पण करण्यासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'ज्या तीन गोष्टी करण्याची मागणी पुणेकरांची होती त्यातील दोन गोष्टी पूर्णत्वास गेल्याचा आनंद आहे. एअरपोर्ट काम पू्र्ण झाले आहे, चांदणी चौक पुलाचे काम पूर्ण झाले आहे, मेट्रोचेही काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे या गोष्टीचा आनंद आहे.' कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. (chandani chowk Flyover pune new bridge bjp leader nitin gadkari inauguration)

गडकरी म्हणाले की, मंत्री झाल्यानंतर अनेकदा पुण्यात आलो. पुणेकरांकडून तीन मागण्या होत होत्या. पुणे मेट्रोचे काम पूर्ण करण्यात यावे. तसेच एअरपोर्टचा विकास करण्यात यावा आणि चांदणी चौक पुलाचे काम करण्यात यावे. यातील दोन गोष्टी पूर्ण झाल्यात, आता मेट्रोचे कामही पूर्ण होत आहे. यासाठी मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. पूल बांधण्यात अनेक अडचणी आल्या. एनडीएने १७ कोटी रुपये वसूल करुन घेतले. अनेक लोकांचे वाद होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पुलासाठी जमीन घेण्याचं काम केलं. त्यासाठी त्यांचेही धन्यवाद.

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम केलं. मी सतत पाठपुरावा करत होतो. अनेक लोकांनी चांगलं काम केलं. पुलाचं डिझाईन आय़आयटीने तयार केलं आहे. पूल चांगला झाल्याचं सर्वजण म्हणतात. या पुलाला सात रस्ते येऊन मिळतात. माझ्या हातातून एक चूक झालेली आहे. मुंबई-पुणे हायवेचे काम माझ्या हातावर झाले. पुण्यात जाणारे सात महापालिकेचे रस्ते मी चांगले केले होते. त्यावेळी हा वेस्टरली बायपास बांधला होता.त्याचवेळी याचे डिझाईन पुढले २०-२५ वर्षे विचारात घेऊन करायला पाहिजे होता. पण, तसं झालं नाही. सर्व्हिस रोड बांधलेले नव्हते, पूल बांधलेले नव्हते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. सातारा रोडचा टनेल करुनही प्रश्न सुटला नाही. आता नवा आराखडा विचारात असून चार स्तरीय वाहतुकीचे नियोजन आहे, असं गडकरी म्हणाले.

पुण्यात प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. हवेतून चालणारी बस पुण्यात आपण घेऊन येणार आहोत. हवेतून चालणाऱ्या बस आपण येथे आणणार असून या स्काय वॉक बसमधून एका वेळेस २५० प्रवासी प्रवास करू शकतात, असं गडकरी म्हणाले. चांदणी चौक पुलाचे काम उच्च तंत्रज्ञानावर आधारित करण्याची माझी इच्छा होती. पुण्यात चाळीस हजार कोटींचे काम केले जात आहेत. आपल्याला पेट्रोल डिझेलला देशातून हद्दपार करायचं आहे. त्यामुळे 40 टक्के प्रदूषण कमी होईल. येत्या काळात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या येतील, असं गडकरी म्हणाले. (Latest Marathi News)

पेट्रोल डिझेलला देशातून हद्दापार करायचंय. त्यामुळे मी इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल यावर भर देत असतो. मी दिल्लीत फिरत असताना इलेक्ट्रिक, हायड्रोजनच्या गाडीत फिरतो. इथेनॉल स्वदेशी उत्पादन आहे. इथेनॉल पर्यावरण पुरक इंधन आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी इथेनॉल इंधनाला प्रोत्साहन द्यावे. हायड्रोजन आपलं भविष्य आहे. कचऱ्यापासून ग्रिन हायड्रोजन तयार करा, हेच भविष्य आहे. माझी गाडी जपानमधून आणलेली आहे. ती हायड्रोजनवर चालते. पेट्रोल-डिझेलचा वापर बंद केला तर ४० टक्के प्रदुषण कमी होईल, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT