Pune Sakal
पुणे

Video Viral : "आमच्या इथे चांदणी चौकातील कोणत्या रस्त्यावरून कसं जायचं याचे क्लासेस घेतले जातील"

पुणे तिथे काय उणे!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे तिथे काय उणे! ही म्हण पुणेकरांच्या कामातून अनेकदा दिसून येते. पुणेकरांच्या घरावर असलेल्या पुणेरी पाट्यांवरील टोमणे पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना काही नवीन नाहीत. पण सध्या अशीच एक पाटी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या चांदणी चौकातील नवीन पुलावरून कसे जायचे याचे क्लासेस आमच्याकडे घेतले जातील अशा आशयाचा बोर्ड धरून एक तरूण चांदणी चौकात उभा असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील नव्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, नव्याने बांधण्यात आलेल्या पुलांच्या जाळ्यातून नागरिकांना कुठून कसे जायचे हे कळत नाही. त्यानंतर पवन वाघुळकर या तरूणाने चांदणी चौकात एक बोर्ड धरून व्हिडिओ काढला आहे. "आमच्या इथे चांदणी चौकाच्या रस्त्यावरून कुठे आणि कसे जायचे याचे क्लासेस घेतले जातील" असं या बोर्डवर लिहिलं आहे.

चांदणी चौकातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पुणेकरांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर येणारे जाणारे नागरिक थांबून हा बोर्ड वाचून हसताना दिसत आहेत. या बोर्डने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. सदर व्हिडिओ पुणेरी स्पिक्स या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्र हवामान अंदाज! पुढचे काही दिवस पावसाचे सावट; आंबा, काजू बागायतीवर परिणाम, असा असेल अंदाज

Nagpur Child Abuse Case : नागपूर हादरलं! जन्मदात्यांनीच १२ वर्षीय मुलाल साखळीने बांधलं, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Resume लगेच अपडेट करा! 2026 मध्ये या विभागात निघणार मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Matar Dhokla Recipe: नेहमीचाच ढोकळा खाऊन कंटाळलात? हिवाळ्यात बनवा मटार ढोकळा, घरच्यांकडून मिळेल वाहवा!

अग्रलेख - कृष्णेच्या काठाकाठाने

SCROLL FOR NEXT