पुणे

पुणे - अपघातग्रस्त टँकर हटवण्यासाठी मुंबईवरून मागवली क्रेन

सकाळ डिजिटल टीम

टँकर उलटल्याच्या घटनेला तेरा तास झाले असून अद्याप टँकर रस्त्यावरून हटवण्यात आला नाही. त्यामुळे नगर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

पुणे - नगर रस्त्यावर चंदननगर येथे ऑइल टँकर उलटल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. चंदननगरमध्ये टँकर उलटल्याच्या घटनेला तेरा तास झाले असून अद्याप टँकर रस्त्यावरून हटवण्यात आला नाही. त्यामुळे नगर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरील हा टँकर हटवण्यासाठी आता मुंबईवरून क्रेन मागवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

टँकर हटवण्यासाठी मुंबईवरून क्रेन आणि टँकरमधील ऑइल काढण्यासाठीचा दुसरा टँकर मागविण्यात आलेले आहेत. वाहतूक पोलीस निरीक्षक अजित लकडे म्हणाले, आम्ही टँकर हटवण्यासाठी यंत्रणा मिळवण्याचा पुणे महानगरपालिका, अग्निशामक दल आणि इतर पेट्रोलियम कंपन्यांसोबत चर्चा करून प्रयत्न केला. परंतु पुण्यात अशी कोणतीही व्यवस्था उपलब्ध होऊ शकली नाही. टँकरच्या मालकाशी संपर्क केलेला असून तो मुंबईतून यंत्रणा घेऊन निघाला आहे. क्रेन आणि टॅंकर खंडाळा पर्यंत पोहोचले असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, प्रचंड वाहतूक कोंडी झाली असताना दुसऱ्या बाजुला काही वाहनचालक ऑइल असलेल्या रस्त्यावरून वाहने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑइलमुळे वाहने घसरत असल्यानं अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनचालकांना वाहने ऑइलवरून नेऊ नये यासाठी स्वंयसेवकांकडून आवाहन केलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT