Chandni Chowk Inauguration 
पुणे

Chandni Chowk Inauguration: "नेता असावा तर नितीन गडकरींसारखा, सर्व सोंग करता येतात पण..."; अजित पवारांनी केले कौतुक

Sandip Kapde

Chandni Chowk Inauguration: वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे आज उद्घाटन झाले. या पुलाचे उद्घाटन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले.

अजित पवार म्हणाले, या पूलासाठी सर्वांनी पाठपुरवठा केला. अनेक शहरांमध्ये रिंग रोड झाले. त्यासाठी नितीन गडकरी यांनी जबाबदारी घेतली. चांदणी चौक जिव्हाळ्याचा आहे. यासाठी खूप अडचणी आल्या मात्र नगरसेवक, आमदार, माजी आमदार, अधिकारी सर्वांनी या पूलासाठी पाठपुवठा केला आणि मार्ग काढण्याचा मार्ग केला.

सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. नितीन गडकरी यांनी पैशाची कमी पडू दिले नाही. दिलदारपणे त्यांनी अडचणी सोडवल्या. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला, नेता असावा तर नितीन गडकरींसारखा, असे अजित पवार म्हणाले. Chandni Chowk Inauguration

अजित पवार म्हणाले मी पालकमंत्री असताना अनेक न्यायालयीन अडथळे आले. मात्र हे सर्व अडथळे पार पाडले. अनेक बैठका घेतल्या. जुना पूल पाडण्याचे यशस्वी नियोजन केले.

अनेक कामे करायची आहेत. कार्यक्रमाला येताना माझी बैठक झाली. मेट्रो मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यायला पाहिजे होते कारण त्यांनी ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर लगेच आढावा बैठक घेतली होती. म्हणजे चांदणी चौकाने कुणालाच सोडलं नाही, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

BABAR AZAM: पहिल्या टेस्टमधून बाहेर, पण आता कमबॅकसाठी सज्ज? बाबर आझमच्या फिटनेसवर पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने दिली मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोर धरणार, हवामान विभागाचा अंदाज

Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT