Chandni Chowk Inauguration
Chandni Chowk Inauguration  
पुणे

Chandni Chowk Inauguration: ना मंत्री, ना आमदार चांदणी चौक उड्डाणपूलाचे श्रेय जाते 'मुख्यमंत्र्यांना'; ट्रॅफिकमध्ये फसले अन्...

Sandip Kapde

Chandni Chowk Flyover : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या चांदणी चौकातील बहुस्तरीय उड्डाणपूलाचे आज उद्घाटन झाले. या पुलाचे उद्घाटन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित नव्हते. चांदणी चौक उड्डाणपूलावरुन श्रेयवादाची लढाई देखील चांगलीच रंगली आहे.

माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात हा वाद सुरू आहे. मेधा कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट करत नाराजी देखील व्यक्त केली होती. २७ ऑगस्ट २०१७ ला पुलाच्या कामाचे भूमिपुजन झाले होते. तेव्हा मेधा कुलकर्णी या आमदार होत्या. त्यांनी सातत्याने या उड्डाणपूलासाठी पाठपुरवठा केला.

मात्र आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगणार आहोत. ज्यामुळे या उड्डाणपूलाचे काम एका वर्षात पूर्ण झाले. चांदणी चौक हा बावधन, एनडीए, पाषाण, मुळशी रोड, पौड रोड, मुंबई - बंगळुरू बायपासला जोडणारा मुख्य चौक आहे. महामार्गावरून हिंजवडीला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. गेल्यावर्षी तर मंत्र्यांचा ताफा या वाहतूक कोंडी फसला अन् थेट निर्णय झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा 26 ऑगस्ट 2022 ला मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जाताना चांदणी चौकात अडकला होता. या मार्गावर ट्रक आणि गाड्यांची रांग लागली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिली आणि जंक्शनवरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नागरी संस्था आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्याकडून उचलण्यात येत असलेल्या पावलेचा आढावा घेतला. त्यांनी थेट नितीन गडकरी यांना कॉल केला होता.

मुख्यमंत्र्यांना पाहताच अनेकांनी त्यांच्याकडे जाऊन तेथे सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे झालेल्या जामची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी नंतर बैठक घेऊन तोडगा काढला. "मी चांदणी चौकातील रस्त्याच्या बांधकामावर लक्ष ठेवून आहे. प्रवाशांना 15 दिवसांत दिलासा मिळेल", असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते. (latest pune news)

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतुकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली होती. त्यानंतर पुढील 15 दिवसात परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT