Chandrakant Patil sakal
पुणे

Pune News : चंद्रकांत पाटील यांनी मागितली पुन्हा एकदा माफी

चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. याप्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. याप्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे - महापुरुषांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. आता पुन्हा एकदा माफी मागतो. शाई फेक झाल्यानंतर घडलेल्या घटनांबाबत माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे वाटते, त्यामुळे आता हा वाद थांबवावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. याप्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे. हा वाद वाढत असल्याने पाटील यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो असून, त्यांच्या कार्याविषयी आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत.

शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते. या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिसांचे निलंबन केले आहे ते त्वरित मागे घ्यावे. जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असे पाटील यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT