bjp Chandrakant patil
bjp Chandrakant patil   esakal
पुणे

''हिंदुत्त्व हा शब्द तुम्ही पुजा पद्धतीशी जोडू नका''

निनाद कुलकर्णी

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पुढील 15 वर्षात अखंड भारत होईल या विधानावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सरसंघचालकांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नका असे म्हटले आहे. हरिद्वारमध्ये बोलताना सरसंघ चालकांनी पुढील 15 वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असे विधान केले होते, तसेच हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असेही म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (Chandrakant Patil On RSS Chief Mohan Bhagwat Statement)

दरम्यान, इतकी ताकद वाढवावी की त्याचा वापरच करण्याची गरज भासू नये असा सरसंघचालकांच्या म्हणण्याचा अर्थ असून त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ कुणी काढू नये असे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच हिंदुत्त्व हा शब्द तुम्ही पुजा पद्धतीशी जोडू नका असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) तो पुजा पद्धतीशी अभिप्रेत नाही. हिंदुमध्येदेखील कुणी गणपतीला मानतं, कुणी देवीला मानतं तर कुणी कुणालाच मानंत नाही पण त्याचा व्यवहार हा दुसऱ्याला मोठं करण्यात आनंद मानणं, दुसऱ्याचं न ओरबाडणं असा आहे.

हिंदू जो शब्द आहे तो आचाराशी, व्यवहाराशी जोजलेला असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. हिंदू राष्ट्राचा जर विचार केला तर, ज्या ज्या ठिकाणी हिंदू संस्कृती होती तेथे आजही मंदीरं आहे, आजही हिंदू विचार पद्धतीप्रमाणे जीवन पद्धती आहे. आता या सर्वांना भारताच्या राजकीय नेतृत्त्वाखाली आणण्याची कल्पना राष्ट्रीय स्वयं संघाची नसल्याचे ते म्हणाले.

भागवतांच्या विधानावर राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला सरसंघचालकांचा सन्मान आणि आदर आहे. भागवतांच्या अखंड हिदुस्थानच्या कल्पनेचं स्वागत आहे. आम्हालाही अखंड भारत हवा आहे. अखंड हिंदुस्तान करण्यास विरोधकांना कुणीही रोखलेलं नाही, मात्र त्याआधी काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करुन त्यांची घरवापसी करा, असा सल्ला शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारला दिला आहे. देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं जात असल्याची सणसणीत टीकाही त्यांनी यावेळी केली आज ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : छ. संभाजीनगरमधून जलील १० हजार मतांनी आघाडीवर

Loksabha Election Results 2024: "हा फक्त ट्रेलर...!" PM मोदी वाराणसीमध्ये ५ हजार मतांनी पिछाडीवर; जयराम रमेश यांचा गर्भित इशारा

India Lok Sabha Election Results Live : जादू काही सेंकदाची! भाजपला मोठा धक्का तर इंडिया इतक्या जागीवर आघाडीवर

Lok sabha nivadnuk nikal 2024 : काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर; इंडिया आघाडी अनपेक्षित यशाकडे

Lok Sabha Election Result: 400 पारचा नारा स्वप्नच? NDA च्या जागा होतायत कमी, इंडिया आघाडीची जोरदार टक्कर

SCROLL FOR NEXT