chandrakant patil Sakal
पुणे

पुणे महानगरपालिकेचे दोन भाग होणे गरजेचे; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

दत्ता लवांडे

पुणे : शहराचा विचार केला तर पुणे महानगरपालिका ही राज्यातीलच नाही तर देशातील विस्ताराने सर्वांत मोठी महानगरपालिका आहे. या महापालिकेच्या आकाराचा आणि लोकसंख्येचा विचार करता दोन भाग व्हायला हवेत असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.

(Chandrakant Patil On Pune Municipal Corporation)

गेल्या काही दिवसांमध्ये पुणे महापालिकेमध्ये २३ नव्या गावाचा सामावेश झाला आहे. त्यामध्ये महापालिकेच्या सिमेशेजारील गावांचा सामावेश आहे. त्यामुळे महापालिकेचे क्षेत्रफळ वाढले पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. शहराचा विकास व्हायचा असेल तर महापालिकेचे दोन भाग होणे गरजेचे आहे असं चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले.

क्षेत्रफळ जेवढं कमी तेवढं विकास करण्यासाठी सोपं जातं असं म्हणत त्यांनी हे वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्यामुळे आता पुणे महापालिकेचे दोन तुकडे होणार का असा सवाल निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन महापालिका आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानुसार जर पुणे महापालिकेचे दोन भाग झाले तर एकट्या पुण्यात तिसरी महापालिका जन्माला येईल.

दरम्यान, महापालिकेत नव्याने सामील केलेल्या २३ गावांमुळे क्षेत्रफळात वाढ झाली आहे. या गावांत महानगरपालिकेच्या योजना हळूहळू पोहोचत असून विकासकामांनाही सुरूवात होत आहे. तर महापालिकेचा कारभार आता प्रशासनाकडे असून दिवाळीनंतर राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. तर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे महापालिकेचे दोन भाग केले जाणार का हे पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT