chandrakant patil Sakal
पुणे

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण नाहीच; सरकारचे आदेश

पुण्यात जो नेता स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करेल तो पुण्याचा पालकमंत्री असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री कोण होणार असा आपुलकीचा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना पुण्यात जो नेता स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करेल तो पुण्याचा पालकमंत्री असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

राज्य सरकारने काल काढलेल्या आदेशात पुण्यात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते पण १५ ऑगस्टला चंद्रकांत पाटील पुण्याऐवजी कोल्हापुरात ध्वजारोहण करणार असल्याचं स्पष्ट झालंय. राज्य सरकारने आदेश काढत त्यांना कोल्हापूरातील ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. चंद्रकांत पाटलांचं नावदेखील पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत असून पुण्यात येत्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जो ध्वजारोहण करेल तो पालकमंत्री असल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. दरम्यान राज्य सरकारने आदेश काढत चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात ध्वजारोहण करणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात चंद्रकांत पाटलांऐवजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ध्वजारोहण करणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुणे आणि सोलापूरचे पालकमंत्रिपद येणार असल्याच्या चर्चा आहेत. नुकताच राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून खातेवाटप बाकी आहे. तर पावसाळी अधिवेशन संपल्यावर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT