Chandrakant Patil will inaugurate Skeen City Film Fan Meeting on 4th June pune madhur bhandarkar sakal
पुणे

Pune : 'स्कीन सिटी चित्रपट रसिक संमेलना’चे उद्‌घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ४ जूनला होणार

संमेलनाच्या अध्यक्षपदी मधुर भांडारकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाच्या (पश्चिम विभाग) वतीने स्कीन सिटी चित्रपट रसिक संमेलन ४ जून रोजी आयोजित केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते मधुर भांडारकर यांची निवड केली आहे.

तर संमेलनाचे उद्‌घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष संयोजन वीरेंद्र चित्राव आणि स्कीन सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन ढेपे यांनी दिली.

यानिमित्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ‘नेक्स्टजेनइनोव्ह ८’चे डायरेक्टर राहुल जैन, सचिव दिलीप बापट आणि ‘आशय’चे सचिव सतीश जकातदार उपस्थित होते. हे संमेलन सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत होणार आहे.

कार्यक्रमात फेडरेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर भांडारकर यांची प्रकट मुलाखत सकाळी सव्वा अकरा वाजता होणार आहे. कार्यक्रमात अभिनेत्री अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, अभिनेता-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर, सुधीर जोगळेकर, निखिल महाजन आदी मान्यवर विचार व्यक्त करणार आहेत.

यावेळी ‘रूपवाणी’ हा विशेष अंक प्रकाशित केला जाणार आहे. ‘फिल्म सोसायटी चळवळीने आम्हांस काय दिले?’, ‘चित्रपट संस्कृतीचे बदलते प्रवाह’ या विषयांवर परिसंवाद होणार आहे. तर ‘फिल्म क्लब समोरील आव्हाने व उपाय’ विषयावर मुक्त चर्चा होणार असल्याचे चित्राव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT