Pune Traffic Update esakal
पुणे

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्यायी मार्ग?

Pune Traffic Update : गर्डर लॉचिंग कामामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, रोहिदास पवार यांनी याबाबत पत्र काढलं आहे. पुढील आदेशापर्यंत हे बदल राहणार आहेत.

Sandip Kapde

Pune Traffic Update:   पुणे शहरामधील सिमला ऑफिस चौकाजवळ टाटा मेट्रो स्टेशन क्रमांक पीएमआर २२ चे गर्डर लॉचिंग कामामुळे शहरातील वाहतूक वळवण्यात येत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्याकरिता सिमला ऑफिस चौक व परिसरामधील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे. पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा रोहिदास पवार यांनी याबाबत पत्र काढलं आहे. उद्या चार तारखेपासून हा बदल असेल.

पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूकीमध्ये बदल करीत आहे.

१. वीर चाफेकर चौक ते न.ता.वाडी के. वी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एस.टी. स्टँड मार्ग) असा सर्व वाहनांकरीता एकेरी मार्ग करण्यात येत आहे.

२. वीर चाफेकर उड्डानपुलावरुन सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - चाफेकर उड्डाणपुलाचे डाव्या बाजूकडील सर्व्हिस रस्त्यावरुन चाफेकर चौक-डावीकडे वळण घेऊन - न.ता.वाढी उजवीकडे वळण घेवून सिमला ऑफिस चौक.

३.फर्ग्युसन कॉलेज रोडवरुन विर चाफेकर चौकामधून सिमला ऑफिस चौकामध्ये जाण्यास प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - चाफेकर चौक- सरळ न.ता.वाडी चौक उजवीकडे वळण घेवून सिमला ऑफिस चौक

४.न.ता.बाडी चौक ते चाफेकर चौक प्रवेश बंद राहील

पर्यायी मार्ग - न.ता. वाडी चौक डावीकडे बळण घेवून सरळ सिमला ऑफिस चौक उजवीकडे वळण घेवून चाफेकर चौक

५. स. गो. बर्वे चौकाकडून येवून सिमला ऑफिस चौकामधून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - सिमला ऑफिस चौक डावीकडे वळण घेवून चाफेकर चौक उजवीकडे वळण घेवून न.ता. वाडी चौक उजवीकडे वळण घेवून शिवाजीनगर रेल्वे स्टेशन.

६. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन कडून येऊन एस. टी. स्टॅन्ड सर्कल वरुन न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.

७. सिमला चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एल.आय.सी कडील बाजूला जावून चाफेकर उड्डाण पुलावरुन जावे.

८. वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्कींग करण्यात येत आहे. (Pune Traffic Update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : सोलापूरच्या मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT