crime Sakal Media
पुणे

बारामतीतील चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मोकळ्या बाटलीत पॅरासिटीमॉल भरुन करत होते काळा बाजार

- मिलिंद संगई

बारामती : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मोकळ्या बाटलीत पॅरासिटीमॉल भरुन काळ्या बाजारात विक्री करणा-या चौघांवर काल तालुका पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती),संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर), प्रशांत सिध्देश्वर धरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) व शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) या चौघांवर तालुका पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

दवाखान्यात रिकाम्या झालेल्या बाटल्या संदीप गायकवाड गोळा करत असे व त्यात पॅरासिटीमॉल भरुन त्या ओरिजनल बाटल्या आहेत असे भासवले जायचे. दिलीप गायकवाड हा हेल्थ इन्शुरन्सचे काम करत असल्याने त्याच्याकडे या इंजेक्शनबाबत नातेवाईक चौकशी करायचे. अशा नातेवाईकांना जादा दराने हे इंजेक्शन देण्याचे काम गायकवाड हा प्रशांत धरत व शंकर भिसे यांच्या मार्फत करत असे. तालुका पोलिसांनी बातमीवरुन या चौघांना पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. दरम्यान बारामतीच्या गोरड हॉस्पिटलमधील स्वप्नील जाधव (रा. फलटण, जि. सातारा) या रुग्णाला हे बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा जबाब डॉ. गोरड यांनी पोलिसांना दिल्यानंतर वरील चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या चौघांनी किती जणांना ही बनावट इंजेक्शन्स दिली होती, कोणत्या रुग्णांना ती देण्यात आली आहेत, या बाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी पोलिस जात असून यात सहभागी सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीची भव्य मिरवणूक, विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT