Charges filed against NCP workers in Smriti Irani agitation case  
पुणे

स्मृती इराणींविरोधात आंदोलन भोवलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : काल राष्ट्रवादी काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता, दरम्यान स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन करणं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांना भोवलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांवर पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महेश हांडे, निलेश निकम, उदय महाले आणि रुपाली पाटील यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात सोमवारी जोरदार राडा झाला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी काही महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचंही व्हिडिओमधून समोर आलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला.

काल स्मृती इराणी यांच्या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच निषेध केला आहे. महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावं अशी मागणी करत सकाळी हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएट इथं माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत, फलक हातात घेऊन त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT