bribe 
पुणे

रेशनकार्डची फी 20 रुपये, मागितले 300 रुपये...असे अडकले जाळ्यात

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक अनिल पाटील व कंत्राटी कामगार जयश्री शेंगाळे यांनी दुबार रेशनकार्ड बनवून देण्यासाठी पैशांची मागणी केल्याने त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे. या दोघांविरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात काल (ता. 22) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली. 

आंबेगाव तहसील कार्यालय घोडेगाव येथील पुरवठा विभागामध्ये काम करणारी कंत्राटी कामगार जयश्री शेंगाळे यांनी डामसे यांच्याकडे दुबार पिवळे रेशनकार्ड बनवून देण्याकरीता 300 रूपये लाचेची मागणी केली. त्यावेळी शासकीय फी 20 रूपये असताना 300 रूपये का मागता? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, डिएसओ ऑफिसला 100 द्यावे लागणार आहेत. त्यावर डामसे हे पुरवठा निरीक्षक अनिल भाऊराव पाटील यांना भेटले व शेंगाळे मॅडम रेशनकार्डचे 300 रूपये मागत असल्याचे सांगितले. त्यावर पाटील यांनी त्यांना शेंगाळे यांच्याकडे 100 रूपये देण्याचे सांगितले. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे आनंद दगडु डामसे (वय 30, रा. गोहे खुर्द) यांनी 6 मार्च रोजी केली होती. त्यानुसार 9 मार्च रोजी सापळा पथकातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षिका प्रतिभा शेंडगे, सुप्रिया कादबाने, नागेश देशमुख, एस. आय. करूणाकर व पंचासमक्ष या तक्रारीची पडताळणी केली. 

त्यानंतर याबाबतची पडताळणी, सापळा कारवाई पंचासमक्ष ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरून तहसील कार्यालयातील अनिल पाटील व जयश्री शेंगाळे यांच्याविरूध्द आनंद डामसे यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. या दोघांविरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात काल (ता. 22) गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक प्रतिभा शेंडगे या करत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT