Charity Comamissioner Appeal to Beware from fake donation collectors 
पुणे

बनावट देणगी संकलकांपासून सावध रहा : धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

सकाळवृत्तसेवा

पुणे : लाॅकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक औषधोपचार व वैद्यकीय सुविधा तातडीने पुरवण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासाठी देशपातळीवर पंतप्रधान सहाय्यता कोष व राज्य पातळीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी स्थापन केले आहेत. या देणग्या सर्व  देणगीदारांनी अधिकृत
https://cmrf.maharashtra.gov.in/DonationOnlineForm.actionसंकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जमा कराव्यात किंवा तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा कराव्यात. 

पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध

या मदत निधीच्या नावाने अशा देणग्या गोळा करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस किंवा अनोंदणीकृत संस्थेस परवानगी नाही. ट्रस्ट कायद्याचे कलम ४१-क अन्वये धर्मादाय आयुक्तांची लेखी परवानगी असल्याशिवाय कोणासही या शासकीय मदत निधीच्या नावाने देणग्या गोळा करण्यास परवानगी नाही. ज्यांना अशी परवानगी मिळाली असेल त्यांना तो परवानगी क्रमांक व कालावधी छापील पावत्यांवर नमूद करणे आवश्यक आहे.

विनापरवाना पैसे गोळा करण्यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. अशाप्रकारे कोणीही बेकायदेशीरपणे पैसे गोळा करत असेल तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा धर्मादाय आयुक्त राजेश जोशी यांनी दिला आहे.

नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून सर्व विभागीय व जिल्हानिहाय धर्मादाय कार्यालयातील अधिकाऱ्यांना विनापरवाना देणग्या गोळा करणाऱ्यांची चौकशी करून फसवणुकीचा प्रकार आढळल्यास त्यांचेविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या हाती मोठी ताकद! आता कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलता येणार, फडणवीसांना नवे अधिकार

समर देणार स्पेशल Surprise, 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतील स्वानंदीचा मॉडर्न लूक पाहून चाहते म्हणाले, 'ही तर...'

E10 Fuel: E10 पर्याय पुन्हा आणावा, जुन्या वाहनांसाठी उपयुक्त; मुख्य आर्थिक सल्लागारांची केंद्र सरकारला सूचना

Marathi News Updates : सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची होणार फैसला? धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना मिळणार?

Madhya Pradesh Road Accident : गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात पिकअप-डंपरची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू, ३२ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT