Vinayak_Sunny_Nimhan 
पुणे

अखेर माजी आमदार विनायक निम्हण आणि सनी निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बाणेर येथील एका जागेच्या वादातून माजी आमदार विनायक निम्हण आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संजय तुकाराम जगताप (वय ३९, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे़. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याच प्रकरणात यापूर्वी सनी निम्हण यांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. बाणेर येथील प्लॉट क्रमांक 36 आणि 64 जवळ हा प्रकार घडला होता. जगताप हे सहा जुलै रोजी सकाळी सहा वाजता कामगारांना चहा देऊन खुर्चीवर बसले होते.

निम्हण यांनी त्या ठिकाणी येऊन कामगारांना शिवीगाळ करून जागा काय तुमच्या बापाची आहे काय, असे बोलले. त्यामुळे जगताप हे खुर्चीवरून उठले असता आरोपींनी लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या हातावर, डोक्यात आणि पोटावर मारून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. 

जगताप यांच्याविरुद्ध सनी निम्हण यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार, निम्हण यांची बाणेर येथील सर्व्हे नंबर 39/5 येथे जागा आहे. जुलै रोजी तेथील रखवालदाराचा फोन आल्याने सनी निम्हण जागेवर पोहोचले. तेव्हा संजय जगताप आणि इतर संबंधित जागेच्या बोर्डाला काळा रंग लावण्याचा आणि पत्र्याचे शेड टाकण्याचा प्रयत्न करीत होते.

सनी निम्हण यांनी जगताप यांना विचारल्यावर त्यांनी हा बोर्ड मला श्रीकांत कुलकर्णी आणि कुलदीपसिंग सोहल यांनी लावायला सांगितले आहे. 'तू मध्ये पडू नको, नाही तर मी तुला संपवून टाकतो. तुझा बाप वाचला आता, मी तुला सोडणार नाही', अशी धमकी देऊन शिवीगाळ करून मारहाण केली. या फिर्यादीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT