cheating with Girl with Rs 19000 by Pretext of job 
पुणे

नोकरीचे आमिष दाखवून एमबीबीएस तरुणीची 19 हजार रुपयांची फसवणूक 

सकाळवृत्तसेवा

पुणे : एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या तरूणीस एका खासगी रुग्णालयात डॉक्‍टर म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने तरुणीची ऑनलाईन माध्यमांद्वारे 19 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याप्रकरणी सोमवार पेठेतील 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी ऑनलाईन माध्यमाद्वारे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणीचे एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण झालेले असून सध्या ती नोकरीच्या शोधात होती. दरम्यान, तिच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्याने तरुणीला एका खासगी रुग्णालयात डॉक्‍टर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर संबंधीत व्यक्तीने तरुणीस बनावट नियुक्तीपत्रही पाठविले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर लिंक पाठवून तिला त्यावर 19 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, तरुणीने 19 हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने पाठविली. त्यानंतर तिने संबंधीत व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठपुरावा केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तसेच तिला दिलेले नियुक्तीपत्रही बनावट निघाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT